शिल्लक राहिलेल्या अन्नाचे १० मिनिटात स्नॅक्स बनवा

7 minute
Read

Highlights १० मिनिटांच्या आत, राहिलेले अन्न वापरून बनवा हे टेस्टी स्नॅक्स -

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आपल्या घरी पार्टी असली किंवा कधीकधी अंदाज चुकला कि जेवण उरते. मग अशा अन्नाचे काय करायचे, हे सुचत नाही. तुम्ही तुमच्या हाऊस हेल्पला नक्की देऊ शकता पण तीहि नसली, तर मग दुसरा उपाय शोधावा लागतो. आता अन्न फुकट घालवणे मनाला अजिबात पटत नाही. कारण चपाती तशी चांगलीच आहे, अजिबात शिळी नाही कि टाकून द्यावी. आणि खरं सांगायचं तर ती चपाती भाजी किंवा भात खायला कंटाळा आलेला असतो.

मग करा ना रिसायक्लिंग, म्हणजे राहिलेल्या अन्नाचे स्नॅक्स किंवा इतर पदार्थांमध्ये रूपांतर. राहिलेल्या पदार्थांमध्ये ब्रेड असू शकतो, चपाती, भात, भाजी, किंवा ठेपलेहि असू शकतात. अशाच पदार्थांचे नवीन स्नॅक्स कसे बनवता येतील हे पाहूया. चपातीचा लाडू तर बऱ्याच जणांच्या डब्यात सापडतो, पण आज आपण अजून काही सर्जनशील रेसिपीस शिकूया. आणि थोडक्यात ⏲करता येतील, जास्त खटाटोप अजिबात नाही, असे स्नॅक्स बघूया. 🍟

सुरु करूया.

१. मसाला इडली.

हा एक बराच फेमस पदार्थ आहे आणि राहिलेल्या इडळींना फुकट न घालवायचा सर्वोत्तम पर्याय. बऱ्याच वेळेला इडल्या उरतात पण चटणी आणि सांबर शिल्लक राहत नाही. मग मसाला इडली, हा मस्त उपाय आहे. छान तडका द्या आणि इडळींना त्या मध्ये कुस्करून चांगले परतून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता, जसे गरम मसाला, पाव भाजी मसाला, किंवा शेझवान सॉस. हा एक नाश्त्याचा प्रकार होऊ शकतो आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल.

२. मसाला पाव.

भाजी उरली आहे का? मिक्स भाजी असेल तर उत्तमच. ब्रेड तर घरी असतो किंवा पटकन विकत घेता येतो. पाव असतील तर क्या बात है! भाजी कढईत गरम करा आणि त्यात पाव भाजी मसाला घाला, म्हणजे चव बदलून जाईल. आता पावामध्ये किंवा दोन ब्रेडच्या स्लाईसमध्ये भाजी पसरून घ्या, त्यावर चीझ किसून घाला आणि सर्व्ह करा. अजून चवीसाठी तुम्ही पाव किंवा ब्रेड तव्यावर थोड्याशा तुपात भाजून घ्या. बघा काय छान लागतील! डब्यासाठीसुद्धा हा एक छान पर्याय आहे.

३. उत्तपम.

डोश्याचे पीठ राहिले आहे का पण परत चटणी आणि भाजी करायचा कंटाळा आलाय? काहीतरी वेगळे करायचे आहे का? मग डोश्याच्या पिठात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कडीपत्ता, आणि मिरची घालून नीट मिसळून घ्या आणि त्याचे उत्तपम बनवा. या बरोबर तुम्ही सुकी चटणी किंवा टोमॅटो सॉस पण घेऊ शकता. उत्तपम चवदार होईल आणि तुम्हाला सांबर किंवा बटाट्याच्या भाजीची आठवण देणार नाही. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी चविष्ट स्नॅक ऑप्शन आहे.

४. चपाती पोहा.

उरलेल्या चपातीचा लाडू आपण बऱ्याच वेळेला खातो. पण तुम्ही पोहा बनवून पण खाऊ शकता. स्नॅक्स साठी चांगली रेसिपी आणि करायला सोप्पी. आपण पोहे करतो ना, तसेच कारायचे. फक्त पोह्यांऐवजी चपातीचा चुरा करून घाला. तळलेले शेंगदाणे, बारीक कांदा, कडीपत्ता आणि जमल्यास थोडीशी बारीक शेव, अगदी उत्तम लागतील हो! आणि पोह्यांबरोबर चहा सुद्धा आलाच. झाली ना एका स्वादिष्ट स्नॅक्स ची सोय. झटपट, अगदी १० मिनिटांच्या आत होणारी.

५. ब्रेड उपमा.

ब्रेड चे स्लाइस उरले असतील तर सॅन्डविच किंवा टोस्ट करून कंटाळा येतो. मग ब्रेड चा उपमा बनवता येईल. ब्रेड चा मिक्सर मध्ये चुरा करून घ्या. क्रम्ब्स पण नक्की घाला कारण त्यात मज्जा आहे. मग एका कढईत हिंग, हळद, मोहरीची फोडणी द्या, आणि त्यात कांदा, मिरची आणि कडीपत्ता परतून घ्या. नंतर त्यात ब्रेड चा चुरा घाला आणि परतून, चार मिनिटे वाफ द्या. त्यावर तुम्ही तळलेले शेंगदाणे घालू शकता आणि गरम गरम उपमा सर्व्ह करा. अगदी सोप्या पद्धतीने करता येतो आणि ब्रेड अजिबात फुकट जात नाही.

५. ठेपला पनीर फ्रँकी

मेथीचे ठेपले किंवा पालक चे पराठे कधीकधी खूप उरतात. फ्रिज मध्ये पनीर सुद्धा बऱ्याच वेळेला शिल्लक असते. मग या सर्व गोष्टींना एकत्र करून तुम्ही फ्रॅन्की बनवू शकता, अगदी तुमच्या आवडत्या फ्रँकी शॉप मध्ये मिळते, तशीच. ठेपला घ्या, त्यावर पुदिन्याची चटणी असेल तर ती लावा नाहीतर टोमॅटो सॉस आणि घरात जे उपलब्ध असतील ते सॉस लावून घ्या. मग किसलेले पनीर एका फ्राय पॅन मध्ये मिरची आणि कांदा घालून परतून घ्या आणि ते मिश्रण ठेपल्यावर स्प्रेड करा. ठेपला तव्यावर थोडेसे बटर घालून परतून घेऊ शकता आणि तुमची फ्रँकी मस्तपैकी तयार आणि संध्याकाळच्या स्नॅक्स चा प्रश्न अशा रीतीने सुटला!

६. भाताचे पॅनकेक

उरलेला भात कसा संपवायचा, म्हणजे एक मोठा यक्षप्रश्नच असतो? कोई बात नही! आपण काहीतरी वेगळे करू. फोडणीचा भात हा तर आपण नेहमीच बनवतो, अगदी पटकन बनण्यासारखा आहे. तर पॅनकेक्स कसे बनवता येतील?

राहिलेल्या भातामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची घाला आणि थोडे पाणी घालून मिसळून घ्या. घट्टपणा आणण्यासाठी थोडे बेसन किंवा तांदळाचे पीठ हि घालू शकता. सिमला मिरची, गाजर सुद्धा बारीक चिरून घालू शकता आणि हे बॅटर मिसळून घ्या. गुठले होऊ नये, याची काळजी घ्या. चवीसाठी मीठ, तिखट आणि गरम मसाला घालू शकता.

मग फ्राय पॅनवर थोड्या तेलावर या मिश्रणाचे पॅनकेक्स करून घ्या. आहे कि नाही सोपी  आणि छान रेसिपी?

७. भाताची भजी.

जर पॅनकेक्स खूपच साधे वाटत असेल आणि मस्त चमचमीत खायचे मन असेल, तर संध्याकाळच्या वेळी भाताची भाजी आणि चहा एक छान बेत होऊ शकतो. हे पकोडे किंवा भजी करायला सोपे आहेत. भातामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरची घाला आणि चवीपुरते मीठ आणि तिखट घाला. या मिश्रणाचे छोटे गोळे करा आणि तळून घ्या. सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा. आणि नंतर गरमागरम चहा व्हायलाच हवा!

मग मैत्रिणींनो, कशा वाटल्या या झटपट होणाऱ्या रेसिपीस? आम्ही खात्री देतो कि १० मिनिटात तुमचे स्नॅक्स तयार होईल. आणि उरलेल्या अन्नाचे टेन्शन अजिबात होणार नाही. तर आजच फ्रिज चेक करा आणि एखादी रेसिपी करून बघा.

Logged in user's profile picture




उरलेल्या इडलीपासून काय बनवता येईल?
हा एक बराच फेमस पदार्थ आहे आणि राहिलेल्या इडळींना फुकट न घालवायचा सर्वोत्तम पर्याय. बऱ्याच वेळेला इडल्या उरतात पण चटणी आणि सांबर शिल्लक राहत नाही. मग मसाला इडली, हा मस्त उपाय आहे. छान तडका द्या आणि इडळींना त्या मध्ये कुस्करून चांगले परतून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता, जसे गरम मसाला, पाव भाजी मसाला, किंवा शेझवान सॉस. हा एक नाश्त्याचा प्रकार होऊ शकतो आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल.
उरलेल्या डोश्याचे पीठपासून काय बनवता येईल?
डोश्याच्या पिठात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कडीपत्ता, आणि मिरची घालून नीट मिसळून घ्या आणि त्याचे उत्तपम बनवा. या बरोबर तुम्ही सुकी चटणी किंवा टोमॅटो सॉस पण घेऊ शकता. उत्तपम चवदार होईल आणि तुम्हाला सांबर किंवा बटाट्याच्या भाजीची आठवण देणार नाही. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी चविष्ट स्नॅक ऑप्शन आहे.
उरलेल्या चपातीचापासून काय बनवता येईल?
उरलेल्या चपातीचा लाडू आपण बऱ्याच वेळेला खातो. पण तुम्ही पोहा बनवून पण खाऊ शकता. स्नॅक्स साठी चांगली रेसिपी आणि करायला सोप्पी. आपण पोहे करतो ना, तसेच कारायचे. फक्त पोह्यांऐवजी चपातीचा चुरा करून घाला. तळलेले शेंगदाणे, बारीक कांदा, कडीपत्ता आणि जमल्यास थोडीशी बारीक शेव, अगदी उत्तम लागतील हो! आणि पोह्यांबरोबर चहा सुद्धा आलाच. झाली ना एका स्वादिष्ट स्नॅक्स ची सोय. झटपट, अगदी १० मिनिटांच्या आत होणारी.