फ्रीलांसर कसे व्हावे? – भाग १

9 minute
Read

Highlights

फ्रीलान्सर व्हायचे आहे का? पण समजत नाही कशी सुरुवात करायची? फ्रीलान्सर सिरीजचा भाग १ वाचा -

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

फ्रीलान्सिंग हे क्षेत्र सध्या खूप चर्चेत आहेत. आपल्या आजूबाजूला तुम्हाला बरेचसे लोक सापडतील जे फ्रीलान्सरस म्हणून ओळख दाखवतात. फ्रीलान्सर बनण्याचे फायदे बरेच आहेत. पण हा पर्याय तुमच्यासाठी नक्की आहे का? किंवा तुम्ही पक्का निश्चय केला आहे कि ‘बस झाली नौकरी आणि चाकरी, आता फ्रीलान्सिंगच करायचे. स्वतः चा बॉस बनायचं आणि मस्त इंडिपेंडंट व्हायचं.’ पण फ्रीलान्सिंग खरंच खूप सेफ आणि सोपे आहे का? त्यात काहीच पळवाटा नाहीत का? किंवा आपण कसली काळजी घेतली पाहिजे का?

फ्रीलान्सिंग म्हणजे नेमके काय? ते रिमोट जॉब पेक्षा वेगळे आहे का? 💻

फ्रीलान्सिंग म्हणजे जेव्हा आपण वेगवेगळ्या कंपन्या आणि प्रोजेक्ट्स वर काम करतो. त्यात आपण त्या कंपनीचे एम्प्लॉयी नसतो, पण इंडिपेंडेंटली त्या प्रोजेक्ट्स वर काम करतो. प्रोजेक्ट संपला कि आपण त्या कंपनीशी बांधून राहत नाही. तसेच, आपल्याला त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसते आणि आपण आपल्या वेळेत प्रोजेक्ट्स वर काम करू शकतो.

रिमोट जॉब मध्ये तुम्ही त्या कंपनीचे एम्प्लॉयी असतात. तुमच्यावर बंधने असतात जी पाळणे गरजेचे असते.

उदाहरण - जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रोजेक्ट्स घेऊन त्यावर काम करू शकता. हो, तुम्हाला आवडतात त्या प्रोजेक्ट्सवर आणि तुमच्या वेळेनुसार ते तुम्ही निवडू शकता.

जर तुम्हाला प्रश्न पडले असतील, मग हि सिरीज तुमच्यासाठीच बनवली आहे. या सिरीज मध्ये आपण स्टेप-बाय-स्टेप जाणून घेणार आहोत कि एक यशवासी फ्रीलान्सर कसे होता येईल.

त्यासाठी आधी फ्रीलान्सिंगचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया.

चला, मग तयार ना! पाहिजे तर पेन आणि पेपर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला काही टिप्स किंवा आपले विचार लिहून घेता येतील.

फ्रीलान्सिंग चे फायदे

१. तुम्ही स्वतः चे बॉस बंता. तुम्हाला कोणाच्या दबावाखाली काम करावे लागत नाही आणि तुम्ही आपल्या वेळेत आणि आपल्या इच्छेनुसार काम करू शकता.

२. तुम्हाला घरातून किंवा फिरती वर असताना सुद्धा काम करता येते.

३. तुम्ही प्रोजेक्ट्स निवडू शकता. जर तुम्हाला एखाद्या क्लायंट किंवा प्रोजेक्ट आरामदायक वाटत नसेल, तर तुम्ही नाकारू शकता.

४. तुम्हाला तुमच्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळून काम करता येते. तुमचे घराकडे लक्ष राहील.

५. काही अटळ कारणामुळे जर तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल, तो तुम्हाला घेता येईल.

फ्रीलान्सिंग चे तोटे

१. फ्रीलान्सिंग स्थिर नसते, हे सर्वाना ठाऊक आहे. जर तुम्ही महिन्याच्या एक तारखेला पगाराची अपेक्षा करत असाल, तर ते फ्रीलान्सिंग मध्ये मिळणे थोडे अवघड जाते.

२. तुम्हाला फेक क्लायंट्सना किंवा स्कॅम्सना सामोरे जावे लागते. हो, हे सुरवातीला होण्याची शक्यता असते, पण तुम्ही जर काळजी घेतली तर ते टाळता येईल.

३. तुम्ही तुमचे बॉस असता आणि म्हणूनच प्रोजेक्टवर काम करण्याची जबाबदारी तुमचीच असते. म्हणून रिस्पॉन्सिबल असणे फार गरजेचे असते. जर तुम्ही सेल्फ-मोटिवेटेड आहात, तर मग तुम्ही एक उत्तम फ्रीलान्सर बनू शकता.

४. कामाच्या वेळा पाळणे कधीकधी कठीण जाते. म्हणून नियोजन करणे बंधनकारक आहे.

फ्रीलान्सिंगच्या महत्वाच्या टिप्स आपण पुढील भागात जाणून घेणारच आहोत, पण त्या आधी आपण काही निर्णायक गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींचा सखोल विचार केलात, तर तुम्हाला पुढील मार्गावर चालायला सोपे जाईल.

. 'व्हाय' जाणून घ्या.

‘सिमोन सिनेक’ यांचे ‘नो युअर व्हाय’ हे पुस्तक वाचून बघा. कोणतीही नवी गोष्ट करण्याआधी तुम्हाला समजायला हवं कि तुम्ही ते ‘का’ करत आहेत. फ्रीलान्सिंग सुरु करण्याआधी तुम्ही समजून घ्या कि तुम्हाला ते का करायचे आहे. तुमची फ्रेंड फ्रीलान्सिंग करून पैसे कमवत आहे, म्हणून ते करायचे आहे कि तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी करायचे आहे? जेव्हा तुम्ही तुमचे कारण स्पष्ट कराल, तेव्हा तुम्हाला तुम्ही मागे वळून बघणार नाही.

असे होऊ शकते कि फ्रीलान्सिंग मध्ये तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल तेव्हा तुम्हाला तुमचे 'व्हाय' स्पष्टपणे दिसेल. सर्वच जण फ्रीलान्सिंग करत आहेत म्हणून तुम्हाला करायचे आहे, हे कारण नक्कीच पुरेसे नाही. तुम्हाला फ्रीलान्सिंग आवडते, आणि तुम्हाला काही फायदे मिळणार आहेत, म्हणून तुम्ही ते करू शकता.

. सर्वांची पुष्टी मिळवा.

घरातील सर्वांची परवानगी मांगा, असे आम्ही नक्कीच म्हणत नाही. पण जेव्हा कोणतीही नवी गोष्ट सुरु करतो, तेव्हा घरातील सर्वांची सहमती असलेली कधीपण चांगली.

आपण प्रियाचे  उदाहरण घेऊया.प्रिया ने फ्रीलान्सिंग सुरु केले कारण तिला घरी राहून तिच्या शाळेत जाणाऱ्या मुलीची काळजी घ्यायची होती. मुलीवर लक्ष राहील हे तिला जास्त महत्वाचे होते. परंतु प्रिया च्या सासूला तिचे घरी राहून काम करणे अजिबात आवडायचे नाही. 👵 "मी आहे ना काव्याची काळजी घ्यायला. तू ऑफिस ला जाऊ शकतेस." मग सासूबाई सारख्या प्रिया ला कामे सांगू लागल्या आणि प्रिया अजूनच फ्रस्ट्रेट होऊ लागली. म्हणून तुम्ही फ्रीलान्सिंग करण्याआधी आधीच घरी डिसकस करा. तुम्ही बाऊंड्रीज सुद्धा आखून ठेवू शकता.

तुमच्या पार्टनर शी डिसकस करणे सुद्धा महत्वाचे नाही. फ्रीलान्सिंग म्हणजे असे नाही कि तुम्ही घर आणि प्रोजेक्ट्स सांभाळत आहात आणि स्ट्रेस होत आहे. कधी गरज लागेल तेव्हा तुम्हाला हि जास्त काम किंवा फोकस करावे लागेल, तेव्हा तुमच्या पार्टनर ने सहकार्य करणे गृहीत आहे.

तुमचे फ्रेंड्स असतील तर तुम्ही त्यांचे मत घेऊ शकता. पुढे तुम्हाला कॉन्टॅक्टस व प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी सुद्धा उपयोग होईल.

थोडक्यात, फ्रीलान्सिंग करण्यासाठी काही महतवाच्या बाबी चेक करणे गरजेचे आहे. जर आईवडील किंवा पार्टनर तयार नसेल, तर तुम्ही त्याने समजून दिले पाहिजे.

. फ्रीलान्सिंग चे फायदे आणि तोटे पूर्णपणे स्वीकारा.

आपण या पोस्टच्या सुरुवातीला पाहिले फ्रीलान्सिंगचे फायदे आणि तोटे पाहिले आहेत. तोटे असणे काही चुकीचे नाही. जसे फुल्ल-टाइम जॉबचे तोटे असतात तसेच फ्रीलान्सिंग चे तोटे असतात. तुम्हाला गुरुकिल्ली सांगू का? तोटे स्वीकारा आणि त्यावर एक मजबूत बॅकअप प्लॅन बनवा. 💪

आम्ही तुम्हाला या बॅकअप प्लॅन बद्दल पुढील भागात सांगणारच आहोत. पण काही टिप्स तुम्ही इथेच वाचू शकता. जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग करता, तेव्हा तुम्हाला एम्प्लॉयर नसतो. म्हणून पि-एफ, मेडिकल इन्शुरन्स या बेनेफिट्स सुद्धा उपलब्ध नसतात. पण त्यावर कपाळावर हाथ लावून बसण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही एखाद्या अडवायझरला कन्सल्ट  करून रिटायरमेंट प्लॅन आखू शकता. मेडिकल पोलिसी विकत घेऊ शकता.

याचाच अर्थ तुम्ही जर आपल्या भविष्याबद्दल जागरूक असाल आणि बरोबर पाऊले उचललीत, तर तुम्हाला फ्रीलान्सिंग चे तोटे जाणवणार नाहीत.

आपण अशाच काही मुद्द्यांवर पुढील भागांमध्ये जाणून घेणार आहोत.

या भागात आपण पाहिले कि फ्रीलान्सिंगचे फायदे आणि तोटे काय असतात, आणि फ्रीलान्सिंग सुरु करण्याआधी आपण कुठल्या तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

पुढचा भाग आम्ही लवकरच घेऊन येत आहोत ज्यात आपण फ्रीलान्सिंग कसे सुरु करायचे हे जाणून घेणार आहोत. तर मग, लवकरच भेटूया!

Logged in user's profile picture

फ्रीलान्सिंग चे फायदे काय आहे?

१. तुम्ही स्वतः चे बॉस बंता. तुम्हाला कोणाच्या दबावाखाली काम करावे लागत नाही आणि तुम्ही आपल्या वेळेत आणि आपल्या इच्छेनुसार काम करू शकता.

२. तुम्हाला घरातून किंवा फिरती वर असताना सुद्धा काम करता येते.

३. तुम्ही प्रोजेक्ट्स निवडू शकता. जर तुम्हाला एखाद्या क्लायंट किंवा प्रोजेक्ट आरामदायक वाटत नसेल, तर तुम्ही नाकारू शकता.

४. तुम्हाला तुमच्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळून काम करता येते. तुमचे घराकडे लक्ष राहील.

५. काही अटळ कारणामुळे जर तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल, तो तुम्हाला घेता येईल.

फ्रीलान्सिंग साठी निर्णायक गोष्टी काय आहे?

'व्हाय' जाणून घ्या..

सर्वांची पुष्टी मिळवा

फ्रीलान्सिंग चे फायदे आणि तोटे पूर्णपणे स्वीकारा