‘हायबीपी’ कमी करण्याचे ११ उपाय !!

6 minute
Read

Highlights

सध्या उच्च रक्तदाबाचा त्रास महिला आणि पुरुषांना होतो आहे. हायबीपीवर योग्यवेळी उपाय करणे गरजेचे आहे कारण तसे केले नाही तर हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेवू शकता. कोणते आहेत ते घरगुती उपाय पाहूया….

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

बदललेल्या जीवनशैलीमुळे सध्या अनेकजण उच्च रक्तदाबाचा सामना करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळतंय.उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी औषध-उपचार केले जातात. पण नैसर्गिक पद्धतीने आपण उच्च रक्तदाब कमी करु शकतो. यासाठी आपला आहार आणि जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे.

फास्टफूड टाळा

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फास्टफूड, जंकफूड, तेलकट,मसालेदार पदार्थांना बायबाय करा. धान्य, ताजी फळे, भाज्या आणि कमी फॅट्स असलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा. स्वयंपाक करताना कच्चे तेल वापरा. केळी, डाबिंळ, मोसंबी, द्राक्षे, पपई तसेच पालक, टोमॅटो, बीट, मेथी, कांदा, आवळा, लसूण हे पदार्थ आहारात घ्यायला हवेत. पोळ्यांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे. दुधाचा, मलईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी आणि इतर उत्तेजक टाळावे. भात, वरण, भाजी, पोळ्या असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.

आहारात सोडियमचं प्रमाण कमी करा

आहारात मिठाचा किंवा सोडियमचा अतिरिक्त वापर हे उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारणं आहे. खाद्यपदार्थांवर वरुन मीठ घेणे बंद करा. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने रक्तप्रवाहामध्ये सोडियमचे प्रमाण वाढू शकते आणि मूत्रपिंडांमधून पाण्याची वहन क्षमता कमी होते. यामुळे उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो.

मद्यपान-धुम्रपान टाळा

मद्यपान, धुम्रपान म्हणजे उच्च रक्तदाबाला निमंत्रणच. अतिरिक्त मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून मद्यपान, धुम्रपान या गोष्टी टाळा.

नियमित व्यायाम करा

दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. त्यामुळे कमीत कमी अर्ध्या तासासाठी व्यायाम करा. चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग असे व्यायाम करता येतील. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब कमी करता येतो. भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरोबिक्स, धावणे हे व्यायामप्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलणे, दंडबैठका, सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम करू नयेत.

तणाव कमी करा

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये ताण-तणाव खूप आहेत. पण अती तणाव उच्च रक्तदाबाला आमंत्रण देतो. म्हणून आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आराम करा. आपली आवड जोपासा मन रमवा, वाचन, चित्रकला,संगीत, बागकाम तुम्हाला जे आवडत ते करा. चिंता विवंचनेतून काही वेळ दूर रहाण्याचा प्रयत्न करा.

पुरेसे पाणी प्या

दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. लघवी साफ होवून किडनीचे आरोग्य चांगले राहते आणि पर्यायाने रक्तदाब आटोक्यात राहतो.

पुढील घरगुती उपायांमुळे तुम्ही उच्च रक्तदाब कमी करु शकता.

लिंबू

वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू रस टाकून दिवसातून तीन वेळा प्यावा. रक्तदाबाची लक्षणे कमी करण्यासाठी लिंबू प्रभावी मानलं जाते.भारतासह अनेक देशांमध्ये बीपी नियंत्रणात करण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो. म्हणून आपण देखील रक्तदाबाच्या समस्येत हा उपाय करू शकतात.

लसूण

उच्च रक्तदाबाला नियंत्रणात करण्यासाठी लसूणचा प्रभावी वापर आपण करु शकतो. दररोज सकाळ-संध्याकाळ मधासोबत एक लसणाची पाकळी खावी. लसूण रक्तशुद्ध करण्याचे कार्य करते.

लसणाची पाकळी

मुळा

मुळ्याच्या पानांमध्ये एंन्टीहायपरटेन्सीव गुणधर्म असतात. जे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी सहाय्यक आहेत. म्हणून जेवणाच्या वेळी ताजा मुळा आणि त्याच्या पानांचा उपयोग सलाद म्हणून करावा. तुम्ही या पानांची भाजी देखील बनवून खाऊ शकतात.

आवळा

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आवळ्याचा देखील वापर केला जातो. आवळ्यामध्ये हायपोलिपीडेमिक आणि एंन्टीहायपरेटिव गुणधर्म असतात. जे नसांमधील रक्तदाब नियंत्रणात करण्याचे कार्य करतात. यामुळे कॉलेस्ट्रॉल आणि अन्य पदार्थांची वाढ थांबवते. एक ग्लास स्वच्छ पाण्यात दोन चमचे आवळ्याचा रस टाका आणि दररोज सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे. आवळ्याचा रस बाजारात सहज उपलब्ध आहे त्याचा उपयोग तुम्ही करु शकता.

आवळा

कांद्याचा रस

कांद्यामध्ये क्वेरसेटिंन नावाचा पदार्थ असतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कांद्याच्या रसात मध घालून त्याचे सेवन केल्यास हाय बीपी कमी होवू शकतो.

उच्च रक्तदाब हा सामान्य आजार जरी असला तरी वेळेतच त्याकडे लक्ष द्यायला हवे. आरोग्य उत्तम असेल तरच जीवनाची वाटचाल योग्यप्रकारे होवू शकते. या घरगुती उपायांनी आणि आपल्या दिनक्रमात छोटेसे बदल केल्यामुळे हायबीपी कमी होवू शकतो पण आपल्याला जास्त त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

घरच्या घरी हाय बीपी कसे कमी करावे?
पुढील घरगुती उपायांमुळे तुम्ही उच्च रक्तदाब कमी करु शकता.

लिंबू

लसूण

मुळा

आवळा

कांद्याचा रस

हाय बीपी कसे टाळावे?

फास्टफूड टाळा

आहारात सोडियमचं प्रमाण कमी करा

मद्यपान-धुम्रपान टाळा

नियमित व्यायाम करा

तणाव कमी करा

पुरेसे पाणी प्या