वधुने लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी, करु नयेत 'या' चुका !

9 minute
Read

Highlights

लग्नात वधु-वर म्हणजे मुख्य आकर्षण असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येतो विवाहसोहळा त्यामुळे लग्नात खास दिसावं असं प्रत्येक वधु-वराला वाटणं सहाजिकच आहे. लग्नाची तयारी करताना वधुचा पेहराव,मेकअप,हेअरस्टाईल, दागिने सगळं कसं नीट जुळून यायला हवं. लग्नाच्या आठवणी फोटोच्या रुपात आयुष्यभर आपल्या सोबत राहतात त्यामुळे प्रत्येक वधुला वाटतं आपण लग्नात खासच दिसायला हवं. या लेखात आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे वधु लग्नात लाखात एक दिसेल. चला तर मग वाचुया वधुने लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी आणि टाळाव्यात 'या' चुका !



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

भारतात ‘विवाहसोहळा’ म्हणजे एक महामहोत्सव असंच म्हणायला हवं. दोन कुटुंबांना जोडणारं हे बंधन आयुष्यभर जपायचं असतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लग्नाची तयारी सुरुच असते. विवाहसोहळ्याची तयारी किंवा नियोजन करणं म्हणजे वधु-वरासाठी मोठा टास्क ! ‘लग्न’सोहळा परंपरांना जपत, आपली सगळी हौसमौज पुर्ण करणारा असावा असं प्रत्येक वधु-वराला वाटत असतं म्हणून लग्न ठरल्यापासूनच जय्यत तयारीला सुरुवात होते.विवाहाता वधुचा थाट काही औरच असतो.तो दिवस वधु-वराचा त्यामुळे दोघेही अतिशय सुंदर, शालीन, रूबाबदार दिसायला हवेत. बरं आपल्या विवाहसोहळ्यात किमान दोनदा ते तीनदा पोशाख बदलावा लागतो. आता तर लग्नाच्या आदल्या दिवशी प्री-वेडिंग सेरीमनीची पद्धत आहे. त्यात संगीत, मेहंदी,हळद, नाचं-गाणे यांची रेलचेल असते त्यामुळे त्याचीसुद्धा तयारी हवीच. लग्नात वधुने कशाप्रकारे तयारी करायला हवी, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबद्दल माहिती देणारा हा लेख आहे. 

  • वधुसाठी लग्नतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेहराव, दागिने, हेअरस्टाईल आणि मेकअप या गोष्टी सेट झाल्या की सगळी कामं पूर्ण झाली असे म्हणायला हवे. आता पोशाखाचं म्हणाल तर बहुतेक लग्नात हेवी वर्क असणाऱ्या, सिल्क किंवा बनारसी साड्या परीधान केल्या जातात. तुम्हाला साडी कॅरी करता आली पाहिजे, त्यासाठी लग्नाच्या काही महिने आधी साडी नेसून ती कशी सांभातात याची प्रॅक्टीस करा. खूप हेव्ही वर्क किंवा जड साडी घेवू नये कारण अनेक मुली साडी खूप कमी नेसतात. साडी सोबत ब्लाऊज, पेटीकोट, दागिने यांची योग्य निवड करा.

  • अनके जणी लेहेंगा घालतात त्याची निवड तुमच्या शरीराचा प्रकार आणि त्वचेचा टोन लक्षात ठेवून करावी. तिने तसा पोशाख घातला म्हणून मला हवा असं नको. लग्न म्हणजे तुमच्या आयुष्यातील खास दिवस आहे. पोशाखामुळे तुमचे फोटो खराब झाले तर…म्हणून जे शोभेल, चांगलं दिसेल तोच पेहराव परीधान कराल. समजा हात जाड असतील तर कोपर-लांबीचा किंवा स्लीव्ह ब्लाउज वापरा. समजा तुमचे वजन अधिक असेल तर लेहेंग्यात जास्त कॅन टाकू नका.
  • तुमचा पोशाख लक्षात घेऊन दागिने निवडा. वधुने हातात मोबाईल किंवा पर्स या सारख्या वस्तू घेऊन जावू नयेत ते चांगलं दिसत नाही. पारंपरिक तसेच मॉडर्न दागिने कधी घालावेत ते पेहरावानुसार आधीच ठरवावे. 

  • मेकअपपासून आऊटफिटपर्यंत प्रत्येक गोष्टींची ट्रायल घेणे आवश्यक आहे. आधीच मेकअप, हेअरस्टाईल, कोणता पेहराव कधी घालणार ते ठरवून ठेवा. लग्नाच्या दिवशी स्वतःवर फार प्रयोग करु नका नाहीतर करायला जालं एक आणि होईल भलतंच काही !
  • तुमची हेअरस्टाईल लूकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, म्हणून लक्षात ठेवा हेअरस्टाइल इतर सर्व गोष्टींसह परिपूर्ण असावी. अंबाडा सोयीस्कर असेल तर किती मोठा अंबाडा हवा, खोटे केस लावायचे असतील तर ते किती लावायला हवेत. अनावश्यक झालर, क्लिप्स लावू नका आणि न आवडणाऱ्या हेअर स्टाईलपासून दूर राहा.
  • सध्या साडीवर सुद्धा एक दुपट्टा घेतला जातो. तो हातात घेवून चालणे ही एक स्मार्ट कल्पना आहे. अगदी लेहेंग्यासोबत दोन दुपट्टे घेण्यास प्राधान्य दिले जाते. एक दुपट्टा लेहेंग्यासाठी तर दुसरा डोक्यावर घेण्यासाठी. म्हणून वधुने दोन दुपट्टे घ्यावेत एक पोशाखासाठी आणि दुसरा डोक्यावर घेण्यासाठी

  • लग्नाचा शेवटचा आठवडा असतो त्यावेळी हेअरकलर टचअप, मॅनिक्युअर, पॅडिक्यअर, आयब्रो करुन घ्या. मसाज घेत असाल तर लग्नाच्या एक आठवड्या आधी मसाजे घेणे उत्तम आहे. ड्रेस, हेअरस्टाईल ट्रायल किंवा त्यात काही फिटींग करायचे असेल तर ते करुन घेणे. 
  • वधुने मैत्रिणीला किंवा बहिणीला काही टास्ट देवून ठेवावेत कारण सगळी कामं जर वधुने हाती घेतली तर तणाव वाढतो. कोणाला काय काम दिलंय ते लक्षात ठेवावं. 
  • तुमचा मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट याच्याकडे जावून आधीच ट्रायल घ्या. तुमचा फिडबॅक यात महत्त्वाचा आहे.तुम्हाला आयलॅनर जाड हवे तर तसे सांगा.लिपस्टीकचा रंग गडद हवा की लाईट हवा. केसांची स्टाईल यात केस किती मोकळे सोडायचे. केसात भांग मधून हवा की साईडने हे सुद्धा आधीच ठरवून ठेवा म्हणजे लग्नाच्या दिवशी धावपळ होत नाही. मेकअप आणि हेअरस्टाईलमध्ये जे काही बदल किंवा प्रयोग करायचे असतील ते लग्नाच्या आठ दिवस आधीच ठरवून ठेवा. पेहराव, दागिने, मेकअप आणि हेअरस्टाईल ठरवून झालं की लग्नाच्या दिवशी धावपळ होत नाही.

  • लग्नात किती वजन वाढवायचं किंवा कमी करायचं यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अति तिथे माती करु नका. प्रत्येक वधुला माहित असतं आपलं शरीर कशाप्रकारे आहे त्याचं ऐका आणि त्यानुसार फिटनेस, आहार ठरवा.
  • लग्नाच्या आठ दिवस आधी वधुने चेकलिस्ट तयार करावी म्हणजे बॅग भरताना गोंधळ होत नाही. वधुची बॅग वेगळीच असावी शक्य झाल्यास बॅगवर एक नोट लावून बॅगेत काय आहे ते लिहावे. 
  • आदल्या रात्री केस धुवायचे आहेत का हे हेअरस्टायलिस्टला आठवणीने विचारा. अनेकदा हेअरवॉश केल्यानंतर केस चांगले दिसत नाहीत तर दुसऱ्या दिवशी चांगले दिसतात. यामुळे लग्नाच्या दिवशी हेअरस्टाईल खूप छान होते. 
  • लग्नाच्या दिवशी अनेक विधी असतात त्यात वधुचे तयार होणे, मेकअप, पोशाख बदलणे याचाही समावेश असतो. अशावेळी मेकअप, ब्लाउज, हेअर स्टाइल, लेहेंगा, दुपट्टा असा क्रम लक्षात ठेवा. घाई करु नका आणि घाबरुन जावू नका कारण थोडासा ताणतणाव जरी आला तरी चेहऱ्यावर तो दिसतो. 

  • लग्नाच्या आधीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. कोणताही ताण मनावर ठेवू नका. हसतमुख, आनंदी रहा. सकाळी हॉलवर जाताना जो ड्रेस, दागिने परिधान करणार आहात ते एका ठिकाणी ठेवा. म्हणजे सकाळी घाई होत नाही. हेअरस्टाईलिस्ट किती वाजता येणार त्यानुसार तुम्ही किती वाजता उठायचे ते ठरवा. पुरेसं पौष्टीक जेवण घ्या, शक्यतो जंक फूड घेवू नका. भरपूर पाणी प्या. रात्री छान झोप घ्या. वधुने बरोबर घ्यायच्या बॅग, पर्स किंवा बॉक्स एका ठिकाणी रचून ठेवाव्यात म्हणजे गोंधळ होत नाही. लग्नाच्या दिवशी सकाळी फ्रेश झाल्यानंतर ब्रेकफास्ट करुन घ्या. पुरेसे पाणी प्या. आवडत असेल तर फळांचा रस किंवा नारळ पाणी घ्यावे.
  • लग्नात वधुचा पेहराव, मेकअप, दागिने ते अगदी फोटोची पोज, गाण्यांची निवड सगळ्या गोष्टी खास करण्याचा प्रयत्न असतो पण यात काही चुका होतात त्या टाळायला हव्यात. कारण लग्नाच्या निमित्ताने झालेली कोणतीही चूक आयुष्यभर फोटो आणि व्हिडीओच्या रूपात तुमच्यासोबत राहते म्हणून...... 
  • वधुने फार गडद मेकअप करु नये. लग्नाचे विधी सकाळी आहेत की संध्याकाळी त्यानुसार मेकअपचा टोन ठरवावा. 
  • जो पोशाख आपण कॅरी करु शकतो तोच पेहराव घालावा. दागिने फार मोठे नसावेत, शोभतील असेच दागिने घालावेत.अति दागिन्यांचा वापर टाळावा.टेन्शन घेवू नका. 
  • मेहंदी, संगीत कार्यक्रमात वधुने फार वेळ डान्स करु नये. पाय किंवा कंबर दुखू लागली तर लग्नाच्या दिवशी त्रास होवू शकतो.

  • हाय हिल सँन्डल घालण्याची प्रॅक्टीस असेल तरच घालाव्यात. लग्नात जेवताना किंवा पाणी पिताना ते दागिने, ड्रेसवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • वधुने आपलं बोलणं, हावभाव यावरसुद्धा संयम ठेवावा. अनेकदा विधी सुरु असताना किंवा अनेक नातेवाईक एकसाथ समोर दिसल्यावर डोळे पाणावतात म्हणून टीश्यु पेपर हाताशी मिळेल असा ठेवावा. वधुसोबत असणाऱ्या करवलीकडे टीश्यु पेपर देवून ठेवावा. 

या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली की वधु लाखात एक दिसेल यात शंकाच नाही. 

 

 



Logged in user's profile picture




वधुसाठी लग्नतील महत्त्वाची गोष्ट कोणती?
वधुसाठी लग्नतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेहराव, दागिने, हेअरस्टाईल आणि मेकअप या गोष्टी सेट झाल्या की सगळी कामं पूर्ण झाली असे म्हणायला हवे