रक्षा बंधन स्पेशल - झटपट होतील असाल ५ डेझर्ट रेसिपीस

7 minute
Read

Highlights

५ डेझर्ट रेसिपीस - सोप्या, कमी वेळेत करण्यासारख्या आणि चवीला अप्रतिम -

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

बरं का मंडळी, या महिन्यात रक्षा बंधन आहे ह! म्हणजे, भाऊरायांचे घरी स्वागत होणार. पण तुमचे बंधुराज म्हणाले आहेत का कि, "ताई, या वेळी नक्की नाही गं. बुधवार आहे ना! वर्कडे आहे मग ऑफिस मधून सुट्टी नाही मिळणार. पण मीटिंग लवकर झाली ना तर नक्की येईन रात्री जेवायला." आता तुम्ही वाट तर नक्की पाहणार आहात आणि मनोमनी अशी प्रार्थना  करणार कि त्याची मीटिंग लवकर संपू दे. पण जेवणाचा बेत काय? मेनू ठरवला आहे का? स्वयंपाकात तुम्ही नक्कीच सुग्रण असाल आणि शॉर्ट नोटीस वर पटकन छान, चमचमीत जेवण बनवू शकाल. पण डेसर्ट चे काय?

तीच नेहमीची खीर किंवा गुलाबजामून, किंवा श्रीखंड कि सरळ आईस-क्रीम ऑर्डर करायचे?

जर तुम्हाला या रक्षा बंधन ला तुमच्या भावाला वेगळे काहीतरी खाऊ घालायचे असेल, तर मग आज आम्ही तुम्हाला काही झटपट डेझर्ट्स ची माहिती देणार आहोत. 😋

तर तयार ना या वर्षी नाविन्यपूर्ण डेझर्ट् बनवायला? आम्ही काही नेहमीच्याच गोड पदार्थांना  थोडा ट्विस्ट करून तुमच्यासमोर पेश करणार आहोत. त्यामुळे ते बनवायला सोपे आणि काहीतरी छान व वेगळे नक्की वाटेल. 😇

. गुलाबजामून पॅंफे.

अहो, आपले नेहमीचेच गुलाबजामून पण त्याला एक सुंदरसा ट्विस्ट द्यायचा आहे आणि खूप छान प्रेसेंटेशन करायचे. तुमच्या कडे फॅन्सी ग्लासेस असतीलच. ते घ्या आणि चांगल्या ब्रँड चे किंवा हलवाईमधून गुलाबजामून आणा.

आता प्रत्येक ग्लास मध्ये एक जामून ठेवा आणि जामूनबाजूने क्रीम पसरून घ्या. तुम्ही ग्रीक योगर्ट चा वापर सुद्धा करू शकता. यु नो, हेल्दी! 😎

मग संपूर्ण पॅंफे वर केसर, पिस्त्याचे काप, मध पसरून घ्या. अगदी दिलखुलासपणे तुम्ही क्रीमचा वापर करू शकता, कारण आज स्पेशल दिवस आहे.

गुलाबजामून बरोबर हे मिश्रण खरंच खूप छान लागते आणि आम्हाला खात्री आहे तुमचे पॅंफे सगळ्यांना खूप आवडेल.

. इन्स्टंट शाही रबडी.

रबडी म्हटलं कि तुम्हाला डोक्याला हाथ लावता का? कारण रबडी बनवायला खूप वेळ आणि संयम ची गरज असते. रबडी तुमच्या भावाची सर्वात आवडती आहे, पण ती बनवण्यासाठी तुमच्याकडे दोन तास नाहीयेत का? काही हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला अगदी सोपी, राबडीची रेसिपी सांगणार आहोत जी तुम्हाला अर्धा तासाच्या आत करता येईल. चकित झालात का?

रबडी मध्ये १-२ लिटर दूध आतून त्याचे क्रीमी लयेर्स बनवले जातात. पण इन्स्टंट राबडी मध्ये सुद्धा आपण कमी वेळेत असेच लयेर्स बनवू शकतो. तुम्हाला काही निवडक गोष्टी लागतील. रिकोटा चीझ, कंडेन्सड मिल्क, केसर मिसळून घेतलेले दूध, वेलची आणि काजू-बदाम-पिस्ताचे काप. हे सगळे मिश्रण करून घ्या. तुम्ही एक मोठा बाउल घेऊ शकता जे तुमच्या फ्रिज मध्ये व्यवस्थित बसेल. किमान अर्धा तास तरी हे मिश्रण फ्रिज मध्ये ठेवा आणि बघा, तुमची लयेर्स वाली रबडी सर्व्ह करायला तयार असेल.

यामध्ये तुम्ही गॅस चा वापर अजिबात करणार नाही. रिकोटा चीझ मुळे तुमच्या रबडीला छान लयेर्स येतील आणि तुमची रबडी फर्स्ट-क्लास बनेल. ती हि कमी वेळेत. मग जेव्हा तुमचे भाऊ तुम्हाला कॉल करून सांगतील कि ते थोड्या वेळेत पोचत आहेत, तुम्ही लगेच हे मिश्रण बनवून फ्रिज मध्ये ठेवा आणि जेवणानंतर सर्व्ह करा.

. चॉकोलेट पेढा. 🍫

तुम्ही नुसते चॉकोलेट पण देऊ शकता, पण जर त्यांना पेढ्याचा आकार दिला आणि भरपूर प्रमाणात केले, तर तुमचे नक्की कौतुक होईल. जर बरीच मंडळी म्हणजे तुमचे भाऊ, वहिनी आणि त्यांची मुले येणार असतील, तर चॉकोलेट पेढ्यांचा बेत आखता येईल. करायला सोपे आहेत आणि तुम्हाला १५-२० मिनिटे लागतील.

एका बाउल मध्ये कंडेन्सड, तूप, मिल्क, मिल्क पावडर, आणि वेलची पावडर मिसळून घ्या. नंतर त्यात दोन मोठे चमचे कोको पावडर घालून चांगले एकजीव करा. आता हे मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा आणि किमान १५ मिनिटांसाठी ते राहू दे. तुम्ही दर ४ मिनिटांनी हे मिश्रण ढवळून घेऊ शकता, असे करून गुठले होणार नाही आणि तुम्हाला समजेल कि ते बेक आणि एकजीव झाले आहे कि नाही. आता हे मिश्रण ३० मिनिटांसाठी थंड करा आणि मग छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे करा. तुम्ही हे पेढे बदामाच्या कापांनी सजवू शकता. रेडिमेड चॉकोलेट देण्यापेक्षा हे इन्स्टंट पेढे नक्कीच चांगले वाटतील.

. चॉकोलेट मूस 🍫

जर चॉकोलेटचाच पदार्थ करायचा असेल पण पेढा नको आहे, मग मूस करून बघा. मूस बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि लहान-मोठे सगळ्यांनाच आवडतो. आम्ही जरी फक्त चॉकोलेट मूस ची रेसिपी देत असलो, तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा सिझननुसार फळांचा पल्प त्यात मिक्स करू शकता. ओव्हन ४५० एफ. वर प्री-हिट करून घ्या. मग एका ब्लेंडर मध्ये कोको पावडर, योगर्ट, कंडेन्सड मिल्क, क्रीम, केसर आणि वेलची पावडर ब्लेंड करून घ्या. नंतर छोट्या जार्स मध्ये किंवा तुमच्याकडे जे कंटेनर्स उपलब्ध असतील, त्यात ते ब्लेंडेड मिश्रण ओतून घ्या आणि ओव्हन मध्ये ठेवा. किमान एक-दोन तास तरी ते मिश्रण राहू दे आणि मग सर्व्ह करा.

जेव्हा घरी भाऊ आणि त्याचे कुटुंब येईल, तेव्हा तुम्ही हे करून ठेवू शकता आणि जेवणानंतर तुमचे मूस तयार!

. शिरा विथ अ ट्विस्ट.

तुमच्या भावाला शिरा आवडतो का? कि शिरा हि तुमची स्पेशालिटी आहे? तर मग शिरा करून घ्या पण थोडा ट्विस्ट असू दे. तुम्ही त्यात अननसाचा पल्प किंवा चिकूचा पल्प घालून शिरा अजून टेस्टी बनू शकता. बच्चे कंपनी असेल तर त्यांना हि खूप आवडेल. शिरा प्रसाद म्हणून दाखवला जातो, आणि अशा रीतीने बनवला तर फ्रुट शिरा म्हणून पण सर्व्ह केला जाता येईल.

मग मैत्रिणींनो, कशा वाटल्या या डेझर्ट रेसिपीस? बनवायला अगदी सोप्या आहेत. काही नेहमीचे पदार्थ आहेत, पण आपण त्यात ट्विस्ट करू शकतो. मग या रक्षा बंधनला भावांना नक्की खाऊ घाला आणि आम्हाला कळवा. ✍

बंधनाच्या मनापासून शुभेच्छा!

Logged in user's profile picture

झटपट होणारी ५ डेझर्ट रेसिपीस कोणती?

गुलाबजामून पॅंफे

इन्स्टंट शाही रबडी

चॉकोलेट पेढा

चॉकोलेट मूस

शिरा विथ अ ट्विस्ट