मासिक पाळी संबंधी, मुलीला अवश्य सांगा ही माहिती !

6 minute
Read

Highlights

'मासिक पाळी' ही एक नैसर्गिक गोष्ट आहे पण जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा काहीवेळी मुली गोंधळून जातात किंवा घाबरून जातात. त्यांच्या मनात मासिक पाळीबद्दल काही गैरसमज निर्माण होतात. एक आई आपल्या मुलीची खूप चांगली आणि जवळची मैत्रिण असते. मासिक पाळी येण्याआधीच जर आईने मुलीला मासिक पाळी संबंधी योग्य माहिती दिली तर मुलींचा मासिक पाळीचा काळ त्रासदायक होणार नाही. मुलीला मासिक पाळीची माहिती कशी द्यावी. तिला नक्की काय सांगावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्की हा लेख वाचा....

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

पहिली 'मासिक पाळी' अर्थात 'ऋतुप्राप्ती' हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्या दिवसांची माहिती मुलीला दिली तर ती घाबरून जाणार नाही. खरंतर प्रत्येक आईची ही जबाबदारी असते की आपल्या लेकीला मासिक पाळीबद्दल संपूर्ण माहिती देणे. समजा मुलीला मासिक पाळीबद्दल तसेच त्यावेळी कशी काळजी घ्यावी? याची माहिती दिली नाही तर अनेक गैरसमज निर्माण होवू शकतात. त्याचा परीणाम मुलीच्या मानसिक आणि शारिरीक आयुष्यावर होवू शकतो. म्हणून मुलीला मासिक पाळीबद्दल योग्य ती माहिती देणे फार गरजेचे आहे. तुम्ही मुलीच्या आई आहात तर मुलीला मासिक पाळीची माहिती कशी द्यावी याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

periods

मासिक पाळीबद्दल कधी सांगावे?

मुलीकडे मासिक पाळीबद्दल जेवढ्या लवकर तुम्ही बोलाल तेवढे उत्तम आहे. मुलीला माहिती देताना सगळं एकदम सांगू नका त्यामुळे मुलीचा गोंधळ उडेल किंवा ती घाबरून जाईल. तिच्या शरीरात काही बदल होत आहेत का किंवा तिला तशी जाणीव होते आहे का त्याबद्दल विचारा. ही एक नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे लाज वाटण्यासारखं काही नाही. तुम्ही मुलीची आई नाही तर एक चांगली मैत्रिण बनून तिच्याशी संवाद साधा म्हणजे तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. कधी ही कोणताही त्रास असेल तर माझ्यासोबत तू बिनधास्त बोलू शकतेस असा विश्वास मुलीच्या मनात निर्माण करा.

मासिक पाळी कधी सुरू होते?

दहा ते पंधरा या वयात मुलींना मासिक पाळी येते. साधारण १२ व्या वर्षी मुलींना पहिली मासिक पाळी येते. आता प्रत्येक मुलीची शारीरिक अवस्था वेगळी असल्यामुळे त्यात फरक पडू शकतो. मासिक पाळी येण्याचे संकेत आधीच मिळत असतात म्हणजे काहीवेळा थोडंस पोटात दुखतं. मळमळ वाटते. शारिरीक आकारात थोडासा बदल जाणवतो.आता मासिक पाळीमध्ये नेमक काय सांगायला हवं? तर पहिल्या मासिक पाळीत हलका रक्तस्त्राव होतो. तो तीन दिवस किंवा पाच दिवसांचा असू शकतो. या काळात होणारी वेदना त्याबद्दल मुलीला स्पष्ट सांगायला हवे. पोटाच्या खालच्या भागात आणि पाठित वेदना होतात. त्यावर घरगुती उपाय सांगायला हवे जेणेकरून तिची भीती कमी होईल.

periods

सॅनिटरी पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कपबद्दल सांगणे

मासिक पाळीबद्दल सांगताना सॅनिटरी पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कपची माहिती आवर्जून द्यायला हवी. त्याचा वापर कसा करावा? कसा करु नये? त्याची विल्हेवाट कशी लावावी? असे सर्व काही सांगायला हवे. मासिक पाळीच्या प्रत्येक दिवशी चार ते आठ तासांमध्ये पॅड आणि आठ ते दहा तासांमध्ये  मेन्स्ट्रुअल कप बदलणे गरजेचे असते अशी माहिती मुलीला द्यायला हवी. तुमच्या अनुभवावरून मुलीला तुम्ही माहिती देवू शकता.

periods

गुप्तांगांची नियमित स्वच्छता

मासिक पाळी दरम्यान गुप्तांगांच्या आजूबाजूच्या त्वचेत रक्त गोळा होते. ज्यामुळे संक्रमण होवून आजारपण येवू शकते म्हणून गुप्तांगांची नियमित स्वच्छता करणे किती महत्त्वाचे आहे त्याची माहिती मुलीला द्यायला हवी. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे तिला समजावून सांगायला हवे. गुप्तांग स्वच्छ करताना योनीकडून पार्श्वभागाच्या दिशेने स्वच्छ करा म्हणजे समोरून मागच्या दिशेने. उलटया दिशेला कधीही करू नका. उलटया दिशेने धुतल्यास पार्श्वभागात असलेले बॅक्टेरिया योनीत जाऊ शकतात आणि संक्रमणाचे कारण बनू शकतात.

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट

वापरलेले पॅडची विल्हेवाच लावण तेव्हढच महत्त्वाचं आहे. काही कंपन्या सॅनेटरी पॅडबरोबर काळ्या रंगाच्या छोट्या पिशव्या देतात त्यात वापरलेला सॅनिटरी पॅड टाकून कचऱ्याच्या डब्यात टाकू शकता. पेपरमध्ये गुंडाळून त्यावर शक्य असेल तर लाल रंगाचा डॉट काढून वापरलेला पॅडची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावू शकता. पॅडस फ्लश करू नका हे मुलीला आवर्जून सांगा. नॅपकीन फेकल्यावर हात नीट धुणे आवश्यक आहे असा ही सल्ला द्या.

periods

रॅशेशपासून कसे दूर राहाल?

मासिक पाळीत जास्त स्त्राव झाल्यास पॅडसचे रॅशेश येण्याची शक्यता असते. म्हणून वेळोवेळी पॅड बदलणे आवश्यक आहे. जर रॅश आले असतील तर अँटीसेप्टीक ओइन्टमेन्ट किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा.

कपड्याला नाही म्हणा

आज ही आपल्या देशात मासिक पाळीबद्दल मुलीसोबत कसे बोलू असा विचार केला जातो. त्याचबरोबर कपडा वापरण्याचा सल्ला दिला जातो पण यामुळे आजार वाढू शकतात.म्हणून सॅनिटरी पॅड वापरण्याचा सल्ला आपल्या मुलीला द्यावा. त्याचे फायदे तिला समजावून सांगावेत.

periods

एक मैत्रिण म्हणून तुम्ही मुलीला मासिक पाळीची माहिती दिली. तिचा विश्वास संपादन केला तर तिच्या मनात मासिक पाळीबद्दल कोणतीही भीती राहणार नाही. समजा काही कारणामुळे तुम्ही समजावून सांगायला सक्षम नसाल तर महिला डॉक्टरांची मदत घेवू शकता. मुलीच्या मनात मासिक पाळीबद्दल काही गैरसमज निर्माण होण्याआधी तुम्ही तिला माहिती देणं केव्हाही चांगलच आहे.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

मुलीला मासिक पाळी कशी समजावून सांगायची?
मुलीकडे मासिक पाळीबद्दल जेवढ्या लवकर तुम्ही बोलाल तेवढे उत्तम आहे. मुलीला माहिती देताना सगळं एकदम सांगू नका त्यामुळे मुलीचा गोंधळ उडेल किंवा ती घाबरून जाईल. तिच्या शरीरात काही बदल होत आहेत का किंवा तिला तशी जाणीव होते आहे का त्याबद्दल विचारा. ही एक नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे लाज वाटण्यासारखं काही नाही. तुम्ही मुलीची आई नाही तर एक चांगली मैत्रिण बनून तिच्याशी संवाद साधा म्हणजे तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. कधी ही कोणताही त्रास असेल तर माझ्यासोबत तू बिनधास्त बोलू शकतेस असा विश्वास मुलीच्या मनात निर्माण करा.
मुलीला तिच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल काय सांगू?

मासिक पाळी कधी सुरू होते

सॅनिटरी पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कपबद्दल सांगणे

गुप्तांगांची नियमित स्वच्छता

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट

रॅशेशपासून कसे दूर राहाल