'फादर्स डे' स्पेशल रेसिपी

6 minute
Read

Highlights 'फादर्स डे' जुन महिन्याचा तिसरा रविवार 'फादर्स डे' म्हणून साजरा केला जातो. 'बाबा' म्हणजे घरातील एक असं व्यक्तीमत्व ज्याचा आदर्श नेहमीच मुलांच्या डोळ्यासमोर असतो. 'बाबा' कुटुंबासाठी आपलं सर्वस्व देतो. अपार मेहनत करतो आणि मुलांना मोठं करतो.तसं पाहिलं तर आपण आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होवू शकत नाही पण असे काही दिवस असतात त्या दिवशी आई-बाबांसाठी काही खास करता येतं. 'फादर्स डे' निमित्त बाबांसाठी खास 'पिझ्झा' आणि 'सेलरी सूप' तयार करा. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिरी चला पाहूया.....

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

‘फादर्स डे’ जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. आपल्या प्रत्येकाला वडिलांच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो. आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत. फादर्स डे निमित्त गिफ्ट किंवा ग्रीटींग कार्ड घेणं हे तर आपण करतोच, पण यंदा फादर्स डेसाठी खास रेसिपी आपण तयार करणार आहोत. रेसिपीसुद्धा अगदी साध्या, सरळ आणि कमी वेळ घेणाऱ्या शिवाय बाबांच डाएट सुद्धा त्यात लक्षात घेतलेलं आहे. 

१९ जून १९१० रोजी अमेरिकेत सर्वप्रथम फादर्स डे साजरा करण्यात आला. याची सुरुवात सोनोरा स्मार्ट डॉड यांनी केली होती. तिला आई नव्हती.तिचा आणि तिच्या भावंडांचा सांभाळ वडिलांनी केला. वडिलांचे प्रेम, त्याग आणि समर्पण पाहून सोनोरा स्मार्ट डॉडला वाटले की एक दिवस वडिलांच्या नावावर असावा आणि  19 जून रोजी त्यांनी फादर्स डे साजरा केला गेला. १९६६ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी अधिकृतपणे हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जाईल, अशी अधिकृत घोषणा केली, त्यानंतर १९७२ पासून अमेरिकेत जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या देशात फादर्स डे साजरा करण्यात येवू लागला. फादर्स डे निमित्त आपण तयार करणार आहोत व्हेज पिझ्झा आणि सेलरी सूप 

'व्हेज पिझ्झा'साठी साहित्य 

2 पिझ्झा बेस

2 टेबलस्पून मेयॉनीज

2 टेबलस्पून टोमॅटो चिली सॉस

2 टेबलस्पून पिझ्झा सॉस 

1 मोठा कांदा डाईंस कट केलेला

2 बेबी कॉर्न स्लाईस कट 

1 वाटीभर ब्रोकली स्लाईस कट 

1 लाल भोपळी मिरची बारीक कट 

1 पिवळी भोपळी मिरची बारीक कट 

चवीनुसार ओरेगॅनो चिली फ्लेक्स

प्रोसेस चीज आवडीनुसार

मॉझरेला चीज आवडीनुसार

बटर गरजेनुसार

कृती 

1. सगळ्या भाज्या डाईस कट करून चिरुन घेणे. समजा तुम्हाला डाईस कट करणे जमत नसेल तर बारीक कट करून चिरून घेवू शकता. 

2. नॉनस्टीक भांड्यात अमूल बटर गरम करून त्यात चिरलेल्या भाज्या छान पतून घ्या. फार शिजवू नका त्यातील क्रिस्पीपणा कमी होतो. कांदा, गाजर, सिमला मिरची, बेबी कॉर्न, मश्रूम छान परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला आवडत असेल तर आपला रेग्युलर टोमॅटो सॉस तुम्ही वापरु शकता.  

3. एका वाटीत पिझ्झा सॉस आणि टोमॅटो चिली सॉस एकत्र करून घ्या. पिझ्झा बेसवर आपण तयार केलेले सॉसचे मिश्रण लावा. त्यावर भाजी छान पसरवून घ्या. सर्वात शेवटी दोन्ही प्रकारचे चीझ त्यावर घाला. 

4. ओव्हन १८०° वर ५ मिनीटे प्रीहीट करून घ्या. एका ट्रेला बटर लावून त्यावर पिझ्झा ५ ते ७ मिनीटे भाजून घ्या. त्यावर ऑरीगॅनो आणि चिली फ्लेक्स भुरभुरले की तयार झाला आपला व्हेज पिझ्झा !! कमी वेळेत घरच्या घरी झटपट होणारा पिझ्झा !!

आता आपण तयार करुया सेलरी सूप जे अतिशय हेल्दी असून बाबा जर डाएट करत असतील तरी त्यांना नक्की आवडेल.

'सेलरी सूप'साठी साहित्य 

1 कप बारीक चिरलेली सेलरी 

तीन-चार बेबी कॉर्न बारीक चिरुन 

छोटी वाटी बारीक चिरलेला ब्रोकली

1 कप बारीक चिरलेला झुकीनी

छोटी वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची

चमचाभर बारीक चिरलेला लसूण 

२ ते ३ वाटी पाणी किंवा स्टॉक वापरु शकता

चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर 

कृती 

1. सॅलरीसह सगळ्या भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात. एका पॅनमध्ये बटर घालून त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. दोन मिनीटे लसूण परतल्यानंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालाव्यात. त्या छान परतून घ्याव्यात. 

2. आता २ वाटी पाणी घालावे. समजा तुमच्याकडे स्टॉक असेल तर त्याचा वापर करु शकता. पंधरा ते वीस मिनीटे शिजू द्या. त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मीरी घाला. 

3. एका ब्लेन्डरने सगळं मिश्रण ब्लेन्ड करुन घ्या. तुम्ही मिक्सरचा वापर सुद्धा करु शकता. अशा प्रकारे तयार आहे आपले हेल्दी सेलरी सूप, सेलरीची पानं थोडं क्रिस्पी करून तुम्ही सजावट करु शकता. 

फादर्स डे ला या रेसिपी नक्की करा, तुमचे बाबा खुष होतील. असं म्हणतात, आई हा घराचा जीव असते तर बाबा आयुष्याचा आधार आहे. आई ही कुटुंबाला वडिलांच्या आधारामुळे व्यवस्थित सांभाळून ठेवत असते हा विचारही मुलांनी नीट कळायला हवा. असा हा बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर, अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांसाठी झटणारं अंतःकरण, मुलांसाठी सर्वात विश्वासू आणि श्रीमंत व्यक्ती म्हणजे बाबा !!  सगळ्यांना  ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा !!

 

अनिता किंदळेकर 

 

 

 

Logged in user's profile picture