गुढी आनंदाची… नव्या पर्वाची !!

7 minute
Read

Highlights

गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, नव्या उपक्रमांचा आरंभ. फक्त महाराष्टातच नव्हे तर भारतात हा सण उत्साहाने, आनंदाने साजरा करतात. आपण किती ही प्रगत झाला तरी आजही घराघरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली जाते.या गुढीपाडव्यानिमित्त आम्ही खास तुमच्यासाठी घेवून आलो आहोत साखर गाठी, कडुलिंब चटणी आणि मालपुआ रेसिपी. या रेसिपी अगदी कमी वेळेत आणि झटपट होणाऱ्या आहेत.

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचे नवीन वर्ष..चैत्राची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा…साडेतीन मुर्हुतापैकी एक मुहुर्त…गुढी उभारुन आपण नवं वर्षाचं स्वागत करतो. गुढीपाडव्याला कडुलिंबाचं  फार महत्त्व आहे. कडुलिंबाची डहाळी गुढीवर बांधली जाते. यादिवशी खास कडुलिंबाची चटणी खाल्ली जाते. त्या मागचं शास्त्रीय कारण असं की कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे असे अनेक औषधी गुण कडुलिंबाच्या अंगी आहेत.कडुलिंबासोबत साखर गाठी देखील गुढीला घालतात. गुढीपाडव्याला या दोघांचा मोठा मान असतो. गुढीला लागणाऱ्या वस्तू आपण बाहेरून खरेदी करतो साखर गाठी सुद्धा पण यंदा आपण साखर गाठी घरी तयार करणार आहोत. तुम्ही म्हणाल काय तरी काय किती कठिण असते ते, तुम्हाला सांगते अगदी सोपे आहे. साखर गाठ, कडुलिंबाची चटणी आणि नैवेद्यासाठी मालपुआ करणार आहोत. सौ. नंदिनी राजेंद्र जोशी यांनी या रेसिपी सांगितल्या आहेत.

साखर गाठी

साहित्य

एक कप साखर

पाव कप पाणी

चमचाभर तूप

गाठी बनविण्यासाठी ६ छोट्या आणि एक मोठी वाटी

जाडसर धागा

चिमुटभर खाण्याचा रंग

साखर गाठी  करण्याची सोपी विधी

कृती

१. वाटीची रचना हाराप्रमाणे करुन ठेवा. म्हणजे तीन-तीन वाट्या बाजूला आणि मधोमध एक वाटी ठेवा. आता वाटीला तूप लावून घ्या आणि त्या वाटीवर धागा ठेवा.

साखर गाठी  करण्याची सोपी विधी

२. आता आपल्याला पाक करायचा आहे. मंद आचेवर पातेले ठेवून त्यात साखर आणि पाणी घाला. आता हे मिश्रम मिक्स करा. साखरेचा पाक तयार होताना त्यात थोडं दूध घालावं. यामुळे साखरेमधील मळी निघून जाण्यास मदत होते. आपल्या साखर गाठी अगदी मोत्याप्रमाणे पांढऱ्या शुभ्र होतात.

साखर पाक

३. आता पाक तयार झाला की नाही ते पहायचं यासाठी पाकाचा थेंब ताटलीवर घ्या. तो पसरला तर समजा पाक तयार झाला नाही. पुन्हा मिश्रण मिक्स करण्याची प्रक्रिया सुरु ठेवा. आता पुन्हा साखरेच्या पाकाचा थेंब ताटलीवर ठेवा. पाहा तो एका जागी जमा झाला आहे आणि खाली घसरून पडत नाही.साखरेचा पाक तयार झाला.

४.आता हा पाक वाटीत ओतायचा आहे. धागा बुडेपर्यंत पाक ओतावा हे लक्षात ठेवा. वाटी काठो काठ भरु नये. आता हे मिश्रण वाळायला ठेवून द्या. साधारण एक ते दोन तासानंतर गाठी वाटीतून काढून घ्या.

साखर गाठी

५. हलक्या हाताने त्या काढाव्यात कारण त्या नाजूक असतात. बघा किती छान झाल्या आहेत. गुढीवर या गाठी किती छान दिसतील ना !

२. कडुलिंबाची चटणी

एक वाटी कडुलिंबाची कोवळी पाने आणि फुले (पाने कोवळीच घ्यावीत नाहीतर चटणी जास्त कडवट लागते)

अर्धा वाटी गुळ

छोटा तुकडा अद्रक

अर्धा चमचा जिरे

अर्धा चमचा धणे

पाव चमचा हिंग

४ ते ५ मीरे

थोडी चिंच

चवीनुसार सैंधव मीठ

चवीनुसार साधे मीठ

चटणी करण्यासाठी मातीचा खलबत्ता

कडुलिंबाची चटणी करण्यासाठी  साहित्य

कृती

१. कडुलिंबाची कोवळी पाने आणि फुले धुवून घ्यावीत. चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढून घ्यावा.मातीच्या खलबत्यात आधी पाने फुले,अद्रक कुटून घ्यावे मग त्यात राहीलेले साहित्य घालावे. चटणी फार बारीक करु नये. तुमच्याकडे खलबत्ता नसेल कर मिक्सरचा वापर तुम्ही करु शकता.

२.अगदी कमी वेळात आणि  झटपट कडुलिंबाची चटणी तयार आहे. काहीजण या चटणीत डाळं किंवा चिंचे ऐवजी आमसुलं घालतात. तुम्हाला आवडत असेल तर त्याचा उपयोग करु शकता.

कडुलिंबाची चटणी

३.मालपुआ

एक वाटी खवा

एक वाटी मैदा

एक वाटी दुध

पाव वाटी पाणी

३ ते ४ वेलची

तळण्यासाठी तूप

सजावटीसाठी सुकामेवा

पाकासाठी

एक वाटी साखर

अर्धा वाटी पाणी

मालपुआ  साहित्य

कृती

१. मैदा आणि खवा एका पातेल्यात घेवून हाताने छान मिक्स करून घ्या.असे केल्यामुळे मैदा आणि खवा छान एकजीव होतात.

मैदा आणि खवा एका पातेल्यात

२. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या मदतीने एकजीव करायचे आहे. मिश्रण फार पातळ आणि जाड होणार नाही याची काळजी घ्या.दूध थोडं थोडं करून त्यात घाला. आपण केलेले मिश्रण असे असावे की तुपात घातल्यावर ते छान पसरवता आले पाहिजे.

३. आता या मिश्रणात वेलचीची पूड घालावी. साधाराण पंधरा मिनिटे हे मिश्रण ठेवून घ्यावे.

वेलचीची पूड

४.आता एका गॅसवर पातेले ठेवून त्यात पाणी आणि साखर घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा. त्यातही थोडी वेलची पुड घाला चव छान लागते. एक तारी पाकी तयार करून घ्या.दुसऱ्या गॅसवर पॅनमध्ये तूप घाला आणि मंद आचेवर तूप  गरम करा.

गॅसवर पातेले  त्यात पाणी आणि साखर

५.आता पळीभर मिश्रण घेवून ते पॅनमध्ये सोडा. छान गोल आकार तयार करा. मंद आचेववर आपले मालपुआ खरपूस तळले जातात. एक बाजू तळून झाली की परतून दुसऱ्या बाजूने मालपुवा तळून घ्या. तुपात तळल्यामुळे त्याचा स्वाद द्विगुणीत होतो. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरु शकता.

मालपुआ तळल

६. आता तळलेल्या मालपुआमधील अतिरीक्त तूप निघाले की त्याला साखरेच्या पाकात घाला. सगळ्या बाजूंनी त्याला पाक लागायला हवा. म्हणजे खाताना तोंडात साखर, खवा आणि तो खरपूसपणा वा वा तोंडाला पाणी सुटलं !! आता सजावटीसाठी सुकामेवा किसून घ्या.

मालपुआ

7. आता पाकातील मालपुआ काढून एका ताटलीत ठेवा त्यात आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा घालून सजावट करा.

तेव्हा यंदाच्या गुढीपाडव्याला या तीन रेसिपी तयार करुन नवीन वर्षाचा आनंद अधिक उत्साहात साजरा करा. घरी तयार केलेल्या साखर गाठी गुढीवर घालून कडुलिंब चटणी आणि मालापुआचा नैवेद्य दाखवा. सगळ्यांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

गुढीपाडवा म्हणजे काय?
गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचे नवीन वर्ष..चैत्राची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा…साडेतीन मुर्हुतापैकी एक मुहुर्त…गुढी उभारुन आपण नवं वर्षाचं स्वागत करतो.
गुढीपाडवा कसा साजरा करते?
उत्सवाचे स्वरूप चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात गुढीपाडव्याला कडुलिंबाचं फार महत्त्व आहे. कडुलिंबाची डहाळी गुढीवर बांधली जाते. यादिवशी खास कडुलिंबाची चटणी खाल्ली जाते
साखर गाठी रेसिपीचे साहित्य?

एक कप साखर

पाव कप पाणी

चमचाभर तूप

गाठी बनविण्यासाठी ६ छोट्या आणि एक मोठी वाटी

जाडसर धागा

चिमुटभर खाण्याचा रंग