गणेश चतुर्थी स्पेशल - मोदक घरी कसे बनवायचे?

7 minute
Read

Highlights

या वर्षी गणपती बाप्पासाठी बनवा चवदार, लुसलुशीत मोदक –

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

बाप्पाचे आगमन करायला तयार आहात का? पूजेच्या साहित्याची यादी तयार असेल, गुरुजींना फोन करूनही झाला असेल, घराची स्वच्छता झाली असेल आणि पाहुण्यांना स्नॅक्स मध्ये काय द्याचे हे सुद्धा पक्के केले असेल. पण हे काय? तुम्ही यावेळी मोदकांची ऑर्डर देणार आहात? वेळ नसेल, तर आम्ही समजून घेऊ शकतो पण जर तुम्हाला मोदक बनवता येत नसतील, तर मग आमची पोस्ट तुम्हाला वाचायला आवडेल आणि उपयोगी पडेल.

मोदक कधीच बनवले नसतील, तर मग आमच्या या सोप्या-सरळ रेसिपीस तुम्हाला नक्की आवडतील. पण त्याआधी एक गोष्ट करा - ते म्हणजे कॉन्फिडन्स आणा कि तुम्हीसुद्धा उत्कृष्ट, रसाळ आणि बाप्पाला आवडतात तसे चवदार मोदक बनवू शकता. आपल्याला मोदकाची रेसिपी माहित असली, तर कधी कधी आपण मोदक बरोबर होतील कि नाही याचा खूप विचार करतो आणि बिचकतो. तर घाबरू नका, बाप्पाचे नाव घ्या आणि सुरुवात करा.

तुम्ही मोदकाचे विविध प्रकार पहिले असतीलच. मिठाई च्या दुकानांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्स चे मोदक बघायला मिळतील जसे मावा मोदक, चॉकोलेट मोदक, काजू मोदक, बटरस्कॉच मोदक आणि बरेच काही. आपण घरी उकडीचे आणि तळलेले मोदक बनवतो. आज आपण अशाच काही पारंपरिक रेसिपीस बघूया.

तळलेले आणि उकडीचे मोदक बनवण्याआधी आपण एक बेसिक स्टेप करूया - सारण बनवून घेऊया.

काही लोक सारण म्हणतात तर काही चवसुद्धा म्हणतात. सारण म्हणजेच मोदकाचे सार.

सारण बनवण्याचे साहित्य:

२ टीस्पून तूप

१/२  कप किसलेले ओले खोबरे

१/१.५  कप किसलेला गूळ

१ टीस्पून वेलची पूड

२ टेबलस्पून बारीक चिरलेले काजु-बदाम

सारणामध्ये तुम्ही खसखसहि घालू शकता. काही लोक गुळाऐवजी साखरेचा वापर करतात कारण गुळाने सारण चिकट बनण्याची शक्यता असते. परंतु जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल, तर नक्की करू शकता. काजू-बदाम हि सुद्धा पर्यायी आहे. काही जणांना फक्त नारळ आणि गुळाचा स्वाद आवडतो. किंवा काहींना काजू आणि बदाम दाताखाली आलेले आवडत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने सारण बनवू शकता. त्याचबरोबर सारण बनवण्यासाठी तुपाचाच वापर करा, तेलाचा वापर अजिबात करू नये.

सारण बनवण्याची कृती:

सर्वात पहिले एक कढई घ्या आणि गॅसवर गरम करत ठेवा. मग तूप घाला आणि जास्त गरम करून देऊ नका. लगेच किसलेले ओले खोबरे, गूळ, वेलची पूड आणि काजू-बदामाचे काप घालून घ्या. गॅस बारीक ठेवा, अजिबात जोरात करू नका. गूळ वितळत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. गूळ विरघळला कि दोन ते तीन मिनिटांसाठी सारण परतून घ्या आणि गॅस बंद करा. जर तुम्ही सारण जास्त वेळ गरम कढईत ठेवलं, तर ते घट्ट आणि चिवट होऊ शकते. म्हणून लगेच एका प्लेट मध्ये काढून घ्या.

घट्ट सारणामुळे मोदक फाटू शकतो आणि मग ते नीट वळता येत नाही. चिवट सारण नक्कीच चांगले लागत नाही. म्हणून सारण जुसी आहे आणि घट्ट नाही, याची दखल घ्यावी.

तळणीचे मोदक

हे मोदक करायला अतिशय सोपे आहे. त्यासाठी लागणारे साहित्याची नोंद करून घ्या.

१ वाटी गव्हचे पीठ

चिमूटभर मीठ

आवश्यकतेनुसार तेल

आवश्यकतेनुसार पाणी

तळणीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात पहिले पीठ भिजवून घ्या. पीठ, चिमूटभर मीठ, थोडेसे तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन पीठ लावून घ्या. पीठ मऊ किंवा साहिल नसावे नाहीतर मोदक फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पीठ कडकच भिजवा. भिजवलेले कणिक झाकून २०-३० मिनिटे ठेवावे.

त्यावेळेत तुम्ही सारण करू शकता, आम्ही कृती वर दिली आहे.

आता कणकेचा लिंबाएवढा गोळा घ्या आणि थोडे पीठ वापरून छोटीशी चपाती लाटून घ्या. आता चपातीच्या मधोमध सारण घ्या आणि काठावर थोडे पाणी लावा. मग हळूहळू हलक्या हाताने मोदकाचा आकार द्या आणि मोदक बंद करा. परत कढईमधे थोडे तेल मध्यम आचेवर गरम करत ठेवा आणि मोदक हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. लक्षात ठेवा ती तुम्ही अगदी अलगद हाताने तळण्याचे काम केले पाहिजे नाहीतर मोदक फाटायची शक्यता असते.

जर तुम्ही वरील कृती व्यवस्थित केली, तर तुमचे मोदक कुरकुरीत होतील. असेच सर्व मोदक तळून घ्या आणि गॅस बंद करा. तुमचे तळणीचे मोदक प्रसादासाठी तयार आहेत.

उकडीचे मोदक

उकड साठी :

१/२ कप मोदकाचे पीठ/ तांदूळ पीठ

२ कप पाणी

२ टीस्पून तूप

२ टीस्पून दूध

१.५ टेबलस्पून मीठ

सारणाची कृती आम्ही वरील भागात दिली आहे. आता उकड कशी काढायची हे बघूया. खूप महिलांना उकड काढणे कठीण जाते, म्हणून आम्ही अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. सर्वात पहिले एक स्टीलचे पातेले गॅसवर ठेवा आणि त्यात पाणी गरम करत ठेवा. मग लगेच तुम्ही पाण्यात चिमूटभर मीठ, दोन छोटे चमचे तूप आणि दूध घालून घ्या. आता, पाण्याला उकळी येईल तेव्हा लगेच गॅस बंद करा. तुमचे लक्ष पूर्णपणे उकडीवर असले पाहिजे. म्हणून सारण आधीच करून ठेवा. आता तुम्ही तांदळाचे पीठ घालू शकता. चांगले मिक्स करून घ्या म्हणजे गुठले होणार नाहीत.

आमचा असा सल्ला आहे कि मोदक पिठी विकत घ्या आणि वापरा, ती म्हणजे चांगल्या ब्रँड ची. मोदक पिठी उत्तम आहे ना, याची काळजी घ्या.

आता पातेले झाकून ठेवा आणि पंधरा मिनिटांसाठी तरी उकड तशीच ठेवा.

आता उकड गरम असतानाच छान मऊ होईपर्यंत मळून घ्या. तुम्ही जितकी मळून मऊ कराल, तेवढे तुमचे मोदक लुसलुशीत होतील आणि सहज वळवता येतील. आता लिंबाच्या आकाराचा गोळा घ्या आणि आपल्या तळहातावर बोटाने दाबून पारी करून घ्या. एक चमचा सारण भरा आणि हलक्या हाताने पाकळ्या करा आणि शेंड्याच्या बाजूला थोडे दाबून घ्या. मोदक बंद करा पण घाई अजिबात करू नका. सर्व मोदक वळून घ्या.

आता मोदक पात्र तयार ठेवा. पात्राची प्लेट किंवा चाळणी असेल, त्यावर थोडेसे तेल लावून घ्या म्हणजे मोदक चिकटणार नाहीत. आता सर्व मोदक अलगदपणे ठेवा आणि पंधरा ते वीस मिनिटे वाफ द्या. थंड झाले कि सर्व मोदक एका स्टील च्या डब्यामध्ये काढुन घ्या.

बाप्पासमोर अर्पण करायला मोदक तयार आहेत. तुपाबरोबर सर्व करा.

Logged in user's profile picture

मोदक सारण बनवण्याचे साहित्य?

२ टीस्पून तूप

१/२ कप किसलेले ओले खोबरे

१/१.५ कप किसलेला गूळ

१ टीस्पून वेलची पूड

२ टेबलस्पून बारीक चिरलेले काजु-बदाम