थंडीची उबदार फॅशन

12 minute
Read

Highlights प्रत्येक ऋतूनुसार महिलांची फॅशन बदलत असते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण उबदार कपडे घालतो, त्यात थोडासा बदल करून तुम्ही हिवाळ्यातदेखील खूप छान फॅशन कॅरी करू शकता. थंडीपासून बचाव आणि स्टायलिश लूक दोन्ही गोष्टींचा आनंद तुम्हाला मिळू शकतो, तो कसा त्यासाठी चला वाचूया थंडीतील उबदार ‘फॅशन’....

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

यंदा थंडीत चक्क पाऊस सुरु झाला त्यामुळे गारवा जरा जास्तच जाणवतोय. आता ऋतू बदलला की आपल्या सवयीसुद्धा बदलतात.बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कपाटातलं स्वेटर, मफलर, कानटोपी, शॉल असं एक-एक करून बरंच काही बाहेर येऊ लागतं.पण रोज रोज तेच कपडे कसे वापरायचे? काही फॅशन स्टेटस सुद्धा आहे की नाही? विशेषतः महिला वर्गाला नेमकं प्रश्न पडतो थंडीत कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करायचे? ज्यामुळे थंडीचाही त्रास होणार नाही आणि आपण स्टायलिश देखील दिसू.  मात्र यंदाच्या हिवाळ्यात स्टायलिश फॅशन करण्यासाठी तुमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

1. वुलन कुर्ती

हिवाळ्यात वुलन कुर्तींचा पर्याय एथनिक, स्टायलिश आणि कम्फर्टेबल असतो. वुलन कुर्तीमुळे तुम्हाला स्टायलिश लुकदेखील मिळतो आणि थंडीपासून बचाव देखील होतो.

वुलन कुर्ती

• प्लेन कलर कुर्ती

प्लेन रंगाच्या कुर्तीमुळे कॉर्पोरेट आणि रॉयल लुक मिळतो त्यामुळे अनेकजणी हा पर्याय स्विकारतात.

• स्कार्फ नेक वुलन कुर्ती

थंडीत आपण स्कार्फचा वापर करतो पण अनेकजणींना स्कार्फ सांभाळण्याचा कंटाळा येतो. अशावेळी कुर्तीलाच जोडलेला स्कार्फ मिळाल्यास? हा पर्यायदेखील बाजारात उपलब्ध आहे. स्कार्फ नेक वुलन कुर्तीचा तुम्ही पार्टी वेअर म्हणून देखील वापर करू शकता. गडद रंगाच्या कुर्तीवर तुम्ही फिकट रंगाचा स्कार्फ अशी रंगसंगतीत सुंदर दिसेल.

• हाय नेक कुर्ती

सध्या बाजारात हाय नेक कुर्तीचा ट्रेंड सुरू आहे.  हाय नेकमध्ये तुम्हाला प्लेन किंवा एम्ब्रोयडरी असलेली कुर्ती मिळेल. मानेचा भाग कव्हर करणारी आणि हलक्या स्वरुपातील हँड वर्क यामुळे त्वचेची काळजी आणि फॅशन दोन्ही गोष्टी साध्य होतात.

• नेक वर्क वुलन कुर्ती

वुलन कुर्तींमध्ये मॉन्ट्रेक्स डिझाइन प्रसिद्ध आहे. यामध्ये तुम्हाला लांब हात, हवा तसा गळ्याचा आकार, गळ्याभोवती डिझाइन,विविध रंग असा एक वेगळा ट्रेंडी लुक मिळेल

२. विंटर वेअर श्रगचा स्वॅग

बदलत्या फॅशन स्टाइलनुसार  स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही श्रगचा वापर करु शकता.फॅशन इंडस्ट्रीमध्ये हा प्रकार जास्त प्रसिद्ध आहे. श्रग तुम्ही जीन्स किंवा लाँग स्कर्टवरदेखील वापरू शकता. बाजारात विविध रंग आणि आकारांमध्ये श्रग तुम्हाला सहज मिळतील.

विंटर वेअर श्रग

• प्रिटेंड श्रग

जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेस म्हणजे टॉप किंवा जीन्स वापरणं आवडत असेल तर त्यावर प्रिटेंड श्रग परफेक्ट दिसतो. यामध्येही विविध पर्यायदेखील तुम्हाला मिळतील. यासोबत लाँग नेकपीसदेखील वापरू शकता.

• लाँग श्रग विथ जीन्स

लाँग श्रग कोणत्याही कपड्यांवर सुंदर दिसतात. केवळ जीन्सवरच नाही तर एखाद्या ड्रेसवरदेखील श्रग छान दिसतात आणि एक वेगळाच लुक मिळतो. ऑफिस ड्रेसवर देखील लाँग श्रगचं कॉम्बिनेशन अगदी भन्नाट दिसतं.

• स्टायलिश स्लीव्हज श्रग
आजकाल विविध प्रकाराच्या स्टायलिश  बाही श्रगची बरीच फॅशन सुरू आहे. यामध्येही लाँग, शॉर्ट, बेल स्लीव्ह्ज, भडकलेली कॉलर असे विविध पर्यायदेखील उपलब्ध आहोत.
• क्रॉप श्रग
समजा तुम्हाला पूर्ण हात झाकलेले आवडत नाहीत तर ड्रेस किंवा जीन्सवर क्रॉप श्रग हा उत्तम पर्याय आहे. क्रॉप श्रग उंचीनं लहान असतात,  पण अतिशय स्टायलिश असतात. जर तुम्ही एखादा प्रिंटेड ड्रेस वापरला असेल तर त्यावर साधा रंगीत श्रग परिधान करावा.

3. जॅकेट

आपण जॅकेट वापरतोच आणि थंडीच जॅकेच हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे. विंटर जॅकेट्समध्ये अनेक ट्रेन्ड्स आलेले आहेत.

थंडीच जॅके

• क्रॉप पफर जॅकेट

थंडीमध्ये सर्वात ट्रेंडी असे हे पफर जॅकेट खूप आरामदायक आणि उबदार आहे. पूर्वी स्कीइंगसाठी वापरले जाणारे हे जॅकेट आता जिथे खूप कडाक्याची थंडी असते अशा ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरते. या

• फर कोट्स

रिच विंटर जॅकेट हवे असेल तर तुम्ही फर जॅकेट्सची निवड करु शकता. फक्त हे रोजच्या रोज घालता येत नाही कारण फरवर पाणी पडले तर ते लगेच ओले होते. यातील वेगवेगळे प्रकार,रंग तुम्हाला पार्टी लुक देतात.

• डेनिम जॅकेट

जीन्समध्ये येणारे जॅकेट्स वर्षभरही वापरता येतात. पॉकेट फ्रेंडली असणारे डेनिम जॅकेट ऑफिसपासून ते एखाद्या पिकनिकपर्यंत अगदी कोणत्याही कपड्यांच्या प्रकारावर हमखास घालता येतात.

डेनिम जॅकेट

• शॉर्ट टेडी जॅकेट

टेडीसारखे गुबगुबीत जॅकेट तुम्ही कॅज्युअल वेअरवर घालू शकता.थंडीपासून संरक्षण आणि स्टायलिश लूक आपल्याला मिळतो.

• रॅप कोट्स

रॅप कोट्स कॉटन, सॉफ्ट लेदर, सूट मटेरिअलमध्ये देखील मिळतात. हे थोडे जाड असल्यामुळे तुम्हाला थंडी तर वाजत नाहीत. पण हे जॅकेट एकदम स्टायलिश दिसते. लांब असल्यामुळे तुम्हाला यामध्ये फॉर्मल ड्रेस किंवा पँटस असे घालता येते.

• बॉम्बर जॅकेट

सध्या या प्रकारात मिळणाऱ्या पातळ जॅकेटची फारच चलती आहे. हे जॅकेट् फारच कॅज्युअल असतात. क्रॉप आणि लाँग अशा दोन प्रकारात बॉम्बर जॅकेट मिळतात. अशा प्रकारचे जॅकेट तुम्हाला छान पार्टीसाठी घालता येतील. जाड प्रकारातील जॅकेट तुम्ही अगदी बिनधास्त ट्रेकला घालू शकता.

बॉम्बर जॅकेट

• वेलवेट जॅकेट

पार्टीसाठी वेलवेट जॅकेट हे एकदम बेस्ट आहेत. तुमच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी वेलवेट जॅकेट हे असायलाच हवे. तुम्हाला ऑफिससाठी ही अशाप्रकारचे जॅकेट वापरता येऊ शकते.

4. नी लेंथ कोट

तुम्हाला क्लासिक फॅशन आवडत असेल तर नी लेंथ कोट हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही कुठल्याही ड्रेसवर याला ट्राय करू शकता. कुठल्याही प्रसंगी हा पर्याय मस्त सूट होईल असा आहे. क्लासी शूज आणि बूट यांच्यासोबत हे कॉम्बिनेशन खास दिसेल.

5. ब्लेझर

ऑफिस किंवा कॉलेज जिथे तुम्हाला प्रोफेशनल लूक कैरी करायचा असेल, तिथे हे कोट आणि ब्लेझर उपयुक्त पर्याय ठरू शकतील. कोट आणि ब्लेझर हे उबदार तर असतातच सोबतच ते तुम्हाला एक प्रोफेशनल लूक देतात. जीन्स, कुर्ती, स्कर्ट सर्व ड्रेसेसवर ब्लेझर सुंदर दिसते.

6. स्कार्फ

हिवाळ्यात स्कार्फ, स्टोल आणि शॉलचा वापर आपण फॅशन म्हणून करु शकतो. स्कार्फ तुम्हाला स्टाईलीश लूक देवू शकतो. स्क्वेअर स्कार्फ, इन्फिनिटी स्कार्फ, रेक्टअँगल स्कार्फ, बंडाना स्कार्फ इत्यादी. टॉप किंवा ड्रेसला मॅचिंग असा स्कार्फ तुम्ही वापरू शकता.थंडीपासून बचावही होईल आणि आकर्षक लुकदेखील मिळेल.स्कार्फ वेगवेगळ्या प्रकारे टाय करून तुम्ही तुमच्या लूकला स्टायलिश बनवू शकता. साधी जीन्स आणि टॉपवर स्कार्फ टाय केला की ते साधं पण खूप सुंदर दिसतात. ट्विस्ट ऍन ड्रॉप, फॅशन नॉट, डबल व्रॅप असे काही स्कार्फ टाय करायचे प्रकार आहेत. ब्लेझरवर मफलर घेतलं तर ते खूप आकर्षक दिसेल. श्रगसोबत स्कार्फ ट्राय केला तर तेही सिम्पल आणि सुंदर दिसेल.

स्कार्फ

7. साडी आणि शॉल

थंडीचे त्रास होवू नये म्हणून हमखास वापरली जाते शाल. सध्या बाजारात डिझायनर, एम्ब्रॉयडरी असलेले शॉलदेखील उपलब्ध आहेत. दुपट्ट्याऐवजी  शाल  वापरल्यास सुंदर एथनिक लुक तुम्हाला मिळेल. ज्या  दिशेने तुम्ही साडीचा पदर सोडलेला असेल त्याच्या विरूद्ध  दिशेनी शॉल हातावर घ्या. यानं तुम्हाला अतिशय सुंदर आणि सोज्वळ असा लुक मिळेल.

8. स्वेटर ब्लाउज

साडीवर स्वेटर ही जुनाट फॅशन आहे असे अनेकजणींना वाटते मग तुम्ही स्वेटरचा ब्लाउज म्हणून वापर करू शकता. यामुळे एका ग्लॅमरस लुक मिळेल. पूर्ण हातांचा किंवा छोट्या बाह्यांचा स्वेटर त्यावर मॅचिंग ज्वेलरी म्हणजे एक नंबर लूक !

9. जीन्स विथ इंडो वेस्टर्न स्टाइल साडी

आता साडीचा विषय निघाला आहे म्हणून सांगते, जरी तुम्हाला हटके इंडो-वेस्टर्न लुक हवा असेल तर जीन्सवर एखादी साडी नेसू शकता. महत्त्वाचे म्हणजे जीन्समुळे तुमच्या पायांना थंडी देखील वाजणार नाही. फक्त जीन्सच्या रंगानूसार साडीची निवड करा.डिझायनर ब्लाउज, साडी आणि जीन्समुळे एक वेगळच फॅशन फ्युजनचा अनुभव तुम्ही घ्याल.

जीन्स विथ इंडो वेस्टर्न स्टाइल साडी

10. कार्डिंग्स

कार्डिंग्सला योग्य वापरला तर्  कमालीचा ग्लॅमरस लूक येतो. याला श्रगसारखंही वापरू शकता.वेस्ट लेंथ कार्डिंग्स शॉर्ट टॉप किंवा स्कर्टवर खूप उठून दिसतात. तसेट ओव्हरसाईज कार्डिंग्स प्लेन जीन्सवर खूप आकर्षक दिसेल. लॉँग कार्डिंग्सही प्लेन आणि डार्क जीन्सवर सुंदर दिसतील. कार्डिंग्स हे ड्रेसपेक्षा डार्क रंगाचे असेल तर ते अधिक उठावदार दिसेल

11. हार्डनेक पुलओव्हर

हार्डनेक पुलओव्हर हा हिवाळ्यातला एक मस्त पर्याय आहे. तुम्ही याला जीन्स किंवा वूलन पॅन्टव्यतिरिक्त लॉंग स्कर्टसोबतही मॅच करू शकता. हिवाळ्यात तुम्ही काळ्या पुलओव्हरसह रंगीबेरंगी पुलओव्हरही तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा. पुलोव्हर हे लूज आणि आरामदायक असल्यामुळे तरुणाई पुलव्हरला जास्त पसंती देताना दिसत आहे. जीन्सवर पुलोव्हर सिंपल आणि सुंदर दिसते. डार्क रंगाचे पुलोव्हर उठून दिसतात. पुलोव्हरवर डेनिम जॅकेट घातलं तरी ते छान दिसते.

हार्डनेक पुलओव्हर

12. कॅप्स

इतर कुठल्याही सीझनमध्ये फार वापरता येणार नाही अशी अ‍ॅक्सेसरी म्हणजे वुलन कॅप्स...तसं पाहिलं वुलन कॅप्स हल्ली बऱ्याच फॅशनेबल झाल्या आहेत. नुसत्या लोकरीच्या कॅप्सपेक्षा निटेड वूलन ब्लेंडच्या कॅप्समध्ये बरीच व्हरायटी आली आहे. त्याचा वापर आपण करु शकता.

तेव्हा आता थंडीत स्टाईलिश लूक कसा करु याची काळजी नक्की मिटली असेल. तुम्ही यातील कोणता लूक कॅरी केला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

हिवाळ्यातील कोणते कपडे प्रचलित आहेत?

वुलन कुर्ती

विंटर वेअर श्रगचा स्वॅग

जॅकेट

नी लेंथ कोट

ब्लेझर

स्कार्फ

साडी आणि शॉल

स्वेटर ब्लाउज

जीन्स विथ इंडो वेस्टर्न स्टाइल साडी

कार्डिंग्स

हार्डनेक पुलओव्हर

कॅप्स

हिवाळ्यातील कोणते कपडे प्रचलित आहेत?

वुलन कुर्ती

विंटर वेअर श्रगचा स्वॅग

जॅकेट

नी लेंथ कोट

ब्लेझर

स्कार्फ

साडी आणि शॉल

स्वेटर ब्लाउज

जीन्स विथ इंडो वेस्टर्न स्टाइल साडी

कार्डिंग्स

हार्डनेक पुलओव्हर

कॅप्स