झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या रेसिपी नक्की ट्राय करा !

6 minute
Read

Highlights 'उपवासा'च्या दिवशी काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो.शक्यतो आपण उपवासाच्या दिवशी घरीच तयार केलेला फराळ खात असतो.उपवास म्हटला की हमखास डोळ्यासमोर येतो साबुदाणा पण सतत तेच पदार्थ खावून कंटाळा येतो मग अशावेळी काहीतरी हटके ट्राय करायला हवं.आषाढी एकादशीला तुमचाही उपवास असेल मग त्या दिवशी काही वेगळे, झटपट आणि पौष्टिक पदार्थ नक्की करून पाहा. आता ते पदार्थ कोणते चला तर मग वाचूया.....

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

आषाढी एकादशीनिमित्तानं अनेकां घरांमध्ये लोकांनी उपवास केलेला असतो. प्रत्येकवेळी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे, बटाट्याचे पदार्थ खायला कंटाळा येतो. म्हणूनच तुमच्यासाठी खास उपवासाच्या वेगळ्या रेसिपी आम्ही घेवून आलो आहोत. शिंगाडा बर्फी,मखाणा पॅटीस,उपवासाची जिलेबी आणि वरी तांदुळांचा उपमा ! आता तुम्ही म्हणालं हा तर एकादशी आणि दुप्पट खाशी बेत होईल. मग तुम्ही यातील एखादा पदार्थ नक्की तयार करून पाहा. कमी वेळेत, घरी जे साहित्य आहे त्यात हे पदार्थ तयार होतात त्यामुळे काळजी नसावी आणि हो याची लज्जत न्यारीच आहे.  

1. शिंगाडा बर्फी 

साहित्य

1 वाटी शिंगाडा पीठ

1/2 वाटी तूप

1/2 वाटी किसलेले गूळ

1/2 टीस्पून वेलची पावडर

सजावटीसाठी बदामाचे काप

कृती 

1. सर्वप्रथम साहित्य एका ठिकाणी ठेवा.आता पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ दहा ते बारा मिनिटे मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

2. पीठ भाजत आले की त्यामध्ये वेलची पूड घाला. गूळ मिक्स करा. गॅस बंद करा. ट्रेला तूप लावून घ्या. आणि मिश्रण ट्रेमध्ये ओता. चमच्याने मिश्रण सारखे थापून घ्या. वरून बदामाचे काप घाला. बर्फी सेट करण्यासाठी बाजूला ठेवा.

3.पौष्टिक आणि झटपट होणारी शिंगाडा बर्फी तयार आहे.

2. मखाणा पॅटीस 

साहित्य

1 कप मखाणे

1 उकडलेला बटाटा

2 टेबलस्पून शिंगाडा पीठ

1 टेबलस्पून दाण्याचं कूट

1 हिरवी मिरची

1 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

1/4 टीस्पून मीठ

1 टीस्पून साखर

1 टीस्पून लिंबू रस

1/2 इंच आलं किसून

1/2 टीस्पून जीरे पूड

2 टेबलस्पून तूप

कृती

1. मखाणे तूपावर छान परतून कुरकुरीत करून घ्या. आता ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात उकडून मॅश केलेला बटाटा,चिरलेली कोथिंबीर,मिरची,किसलेल आलं,जिरेपूड,लिंबाचा रस,साखर,मीठ आणि शिंगाडापीठ घालून छान मिक्स करून ठेवा.

2. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यांना पॅटीस चा आकार द्या. तुमच्याकडे साचा असेल तर ठिक नाहीतर लाडूप्रमाणे आकार देवू शकता. आता तव्यावर साजूक तूप घालून पॅटीस शॅलो फ्राय करून घ्या.

3. गरमा गरम पॅटीस दह्या सोबत सर्व्ह करा. चटणीची खास गरज नाही दह्याबरोबर मस्त लागतात. 

3. उपवास स्पेशल जिलेबी

साहित्य

1 उकडलेला बटाटा

1/4 कप साबुदाणा पीठ

1/2 कप राजगिरा पीठ

1/2 कप दही

आवश्यकतेनुसार पाणी.

तळण्यासाठी तेल / तूप

पाकासाठी

१ आणि १/२ कप साखर

2 कप पाणी

1 टीस्पून केशर सिरप

1 टीस्पून बदामाचे स्लाइस

कृती 

1.बटाटा उकडून मग किसून घेतला आहे. त्यात साबुदाणा पीठ,राजगिरा पीठ,दही घालून छान मिक्स केले.गरजेनुसार पाणी घालून छान मिक्स केले आहे.

2. एका प्लास्टिकच्या पिशवीत बॅटर भरून घ्या. मग टोकाला पिशवी थोडी कापून घ्या.पॅनमध्ये तेल तापवून मध्यम आचेवर जिलब्या पाडून घ्या आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

3. साखरेचा पाक करून घ्या.त्यात केशर सिरप घाला यामुळे छान रंग आणि चव येते. तयार जिलब्या साखरेच्या पाकात पाच मिनिटे घोळवल्या की झालं जिलेबी तयार आहे. 

4. जिलब्या बदामाच्या स्लाइसने सजवून सर्व्ह करा. या अगदी झटपट होतात आणि चवीला तर उत्तमच आहेत.

4. वरी तांदुळाच्या उपमा

साहित्य  

1 वाटी वरीचा तांदूळ

1 चमचा लाल तिखट

6-7 टेबलस्पून दाण्याचा कूट

6 टेबलस्पून दाण्याचा कूट

चवीप्रमाणे मीठ साखर एक फोड लिंबू

हिरवी मिरची बारीक चिरून

2 चमचे तूप

1 बटाटा बारीक चिरून

कृती

1 वरीचा तांदूळ पहिल्यांदा कढईमध्ये कोरडाच भाजून घ्या नंतर तो पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. कढईमध्ये तूप किंवा तेल जे तुम्हाला आवडेल ते दोन चमचे घाला यामध्ये मिरची टाकून भाजून घ्या एक बटाटा बारीक चिरून या तुपावर ती परतून घ्या नंतर यामध्ये धुतलेली वरीचा तांदूळ घालून तुपावर परतून घ्या

2. आता यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घाला चवीप्रमाणे मीठ साखर लाल तिखट घाला या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये दाण्याचा कूट घाला आता हा भात उकळल्यानंतर बारीक गॅस वरती झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या.गरम गरम भात दह्याबरोबर गोड लिंबू लोणचे बरोबर खायला द्या आपण या मध्येच लाल तिखट मिरची आणि दाण्याचा कूट घातला आहे त्यामुळे आपल्याला वेगळा सार बनवण्याची गरज नाही.

झटपट तयार होणाऱ्या या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा.घरातले सगळेजण तुमचं कौतुक करतील.

अनिता किंदळेकर

 

 

Logged in user's profile picture