पावसाळ्यात त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्यावी?

7 minute
Read

Highlights

आपल्या त्वचेला आणि केसांना पावसाळ्यातील ओलाव्यापासून सांभाळा - या टिप्स नक्की वाचा

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

उन्हाळ्यानंतर आपण वर्षा ऋतूचे आनंदाने स्वागत करतो. परंतु पावसाळा आला कि वातावरणात बदल होतात. आर्द्रता आणि ओलावा वाढतो ज्यामुळे आपली त्वचा अजूनच तेलकट होते आणि केस गळू लागतात. तसेच, पावसात नकळत भिजल्याने मेकअप टिकत नाही व केस ओले आणि निस्तेज होतात.

तर अशा पावसाळ्याचे स्वागत करताना आपण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेऊ शकतो, हे या पोस्ट मध्ये तुम्ही वाचू शकता. ☔

त्वचा

१. क्लीनझिंग हे त्वचेसाठी खूप गरजेचे आहे, पण पावसाळ्यात दररोज करावे का? हो, नक्कीच. पावसाळ्यातही हवेत धूळ आणि आद्रता असते ज्याने तुमची त्वचा स्वच्छ दिसत नाही. म्हणून दिवसातून दोनदा एखाद्या चांगल्या दर्जेच्या क्लीन्झरने त्वचा स्वच्छ करणे गरजेचे आहे.

२. आठवड्यातून एकदा हलक्या हाताने त्वचा स्क्रब किंवा एक्सफॉलिएट करा. म्हणजे तुमच्या त्वचेवर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येणार नाहीत. तुम्ही मध आणि साखर किंवा कॉफीने सुद्धा स्क्रब केले तरी चालेल.

३. जरी हवेत ओलावा असला तरी मॉइश्चराइझ करणे गरजेचे आहे. आता आम्ही म्हणत नाही कि तुम्ही हेवी  मॉइश्चरायझर्सने आपली त्वचा हाइड्रेट घेतली पाहिजे. असे केल्याने नक्कीच पिंपल्स ना सामोरे जावे लागेल. पण तुम्ही एखादे ऑइल-फ्री मॉइश्चराइझरचा वापर नक्की करू शकता. क्लीनझिंग केल्यानांतर त्वचेवर हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावा आणि आपल्या त्वचेला सुरक्षित ठेवा. जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर वेगवेगळे मॉइश्चरायझर्स तपासून पहा नाहीतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बघा.

४. त्वचेवर सनस्क्रीन लावा. आता तुम्ही म्हणाल कि पावसाळ्यात सूर्य दिसतच नाही, मग सनस्क्रीन कशासाठी? आम्हाला माहीत आहे कि पावसाळ्यात बरेच दिवस सूर्य अजिबात दर्शन देत नाही, पण याचा अर्थ असा नाही कि यु-व्ही रेझ आकाशात नसतात. हे घातक किरणे तुमच्या चेहऱ्यावर नकळत पोचत असतात आणि तुमच्या त्वचेचे नुकसान करू शकतात. म्हणून सनस्क्रीन लावणे टाळू नका. एस-पी-एफ ३० चे सनस्क्रीन असले तरी चालेल.

५. तेलकट त्वचा असलेल्या महिलांसाठी हि एक स्पेशल टीप आहे. पावसाळ्यात ओलावा वाढतो आणि त्वचा अजूनच तेलकट बनते. मेकअप लावणे तर सोडूनच द्या, पण सारखा तेलकट होणार चेहरा सांभाळणं खूप कठीण जाते. म्हणून ब्लॉटिंग पेपर्स आपल्या बॅगेत ठेवत जा आणि चेहरा जेव्हा तेलकट वाटेल, तेव्हा पेपर ने टिपत जा. स्क्रब किंवा जोरजोरात घासण्याची अजिबात गरज नाही. फक्त टिपत जा आणि त्वचेवर तेल साठवू देऊ नका. त्याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत आणि तुम्हाला छान वाटेल.

तसेच, पावसाळ्यात शक्यतोवर ऑइल-फ्री प्रॉडक्ट्सचाच वापर करा. ज्याने तुमचा चेहरा अजून तेलकट दिसणार नाही.

६. मेकअपचा वापर टाळा.

पावसाळ्यात शक्यतो मेकअप चा वापर टाळा. कारण पाऊस नेमका कधी पडेल सांगता येत नाही, आणि मेकअप असलेला चेहरा कधीपण खराब होऊ शकतो, आणि अजूनच पंचाईत होऊन जाते. म्हणून मेकअप टाळा. जर तुम्हाला कुठल्या पार्टी किंवा इव्हेंट ला जायचे असेल, आणि मेकअप अनिवार्य असेल तर त्या स्थळी पोचल्यावर मेकअप करू शकता. आणि मेकअप काढल्याशिवाय झोपू नका.

७. पुरेसे पाणी प्या.

पावसाळ्यात पाणी कमी पिता का? असे अजिबात होऊ देऊ नका. पाणी प्यायल्याने वॉशरूम ला लगेच जावे लागते कारण हवामान थंड असते. म्हणून बऱ्याच महिला व मुली पाणी कमी पितात. पण जर तुम्ही पाणी कमी प्यायले तर तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर कसे पडणार आणि मग तुमची त्वचा तजेलदार कशी दिसणार. म्हणून दिवसातून किमान २ लिटर तरी पाणी पित जा.

केस

१. केस नेहमी स्वच्छ ठेवत जा. आठवड्यातून किमान दोनदा तरी केस एखाद्या क्लॅरीफायिंग शाम्पू ने धुवत जा. पावसाळ्यात केसात घाम, पाणी, धुळीचे कण अडकून राहू शकतात ज्याने तुमचे केस रुक्ष बनतात. म्हणून केस धुवायचा कंटाळा करू नका.

२. केसांना धुतल्यावर कॅडिश्नर लावत जा. जर तुम्ही कॅडिश्नर लावत नसाल, तर केस धुण्याआधी हेअर मास्क लावा. जरी हवेत ओलावा असला तरी तुमच्या केसांना कंडिशनरची जास्त गरज असते. शॅम्पू हा पुरेसा नसतो.  राईस वाटेर ने केस वॉश करा. चांगल्या कंडिशनरचे काम करते.

३. हीट चा वापर टाळा. पावसात भिजल्याने केस सारखे ओले होतात. म्हणून बऱ्याच महिला ड्रायरचा वापर जास्त करतात. हो, आम्हाला मान्य आहे कि ड्रायर ने केस पटकन सुकतात. पण ड्रायर आणि अन्य काही हीटिंग डिवाईसेस ने तुमचे केस शुष्क होऊ शकतात. म्हणून केसांना वाळवायचे असेल तर ड्रायरचा वापर न करता ते तसेच वाळू द्या किंवा टॉवेल चा वापर करावा.

४. हवेत ओलावा आणि आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे केस चिकट होऊ शकतात. म्हणून केसांना ग्रीसी प्रॉडक्ट्स लावू नका. जेल्स किंवा तसे प्रॉडक्ट्स जर तुम्ही नियमित लावत असाल, तर पावसाळ्यात वापरण्याचे टाळा. सिरम्स चा वापर करू शकता पण ऑइल-फ्री असेच पर्याय शोधाआणि वापरा.

५. ओले केस बांधता का? आमचा सल्ला आहे कि ओले केस बांधायचे टाळा. कारण त्याने केस तुटतात, केसात कोंडा होऊ शकतो आणि केसांचा शेपही बिघडतो. केस ट्रिम करून घ्या म्हणजे स्प्लिट एंड्स होण्याचे टाळता येईल. आणि ओले केस अजिबात बांधू नका.

६. जर तुम्हाला एखाद्या महत्वाच्या मीटिंगला किंवा डेटला जायचे असेल तर नॅचरल ड्रायर चा वापर करा किंवा लो हीट सेटिंग वर ठेवा. म्हणजे केसहि वाळतात आणि केस तुटणार नाहीत. डिफ्युजरचा हि वापर करता येईल.

७. समतोल आहार घ्या. हो, पावसाळा म्हटला कि गरम गरम कांदा भजी आणि चहा डोळ्यासमोर येतो. लॉन्ग ड्राईव्हला जाणे आणि भजी-वडापाव-चहा चा आस्वाद घेणे हे तर प्रत्येकाच्या बकेटलीस्टमध्ये दरवर्षी असते. प्लॅन नक्कीच मस्त आहे, पण आपल्या आहाराची काळजी घ्या. आहार पोषक असावा. कधीकधी तेलकट पदार्थ खाणे वाईट नाही. पण फळे, भाज्या, अंडी, कडधान्य यांचा समावेश जास्त प्रमाणात असू द्या. पावसाचा आनंद लुटा, पण  पौष्टिक पदार्थांचे सेवन हि करत जा.

पाणसाळयासाठी सज्ज का? आम्हाला खात्री आहे कि हे सर्व टिप्स तुम्हाला उपयोगी होतील. पावसाळा एन्जॉय करा, आणि आपल्या त्वचेची आणि केसांचीहि काळजी घ्या.

Logged in user's profile picture

पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

क्लीन्झरने त्वचा स्वच्छ करणे गरजेचे आहे.

आठवड्यातून एकदा हलक्या हाताने त्वचा स्क्रब किंवा एक्सफॉलिएट करा

जरी हवेत ओलावा असला तरी मॉइश्चराइझ करणे गरजेचे आहे

त्वचेवर सनस्क्रीन लावा

मेकअपचा वापर टाळा.

पुरेसे पाणी प्या

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?

केस नेहमी स्वच्छ ठेवत जा

केसांना धुतल्यावर कॅडिश्नर लावत जा

हीट चा वापर टाळा

हीट चा वापर टाळा

समतोल आहार घ्या