खुसखुशीत स्नॅक्ससाठी स्टोरेज हॅक्स

8 minute
Read

Highlights

क्रिस्पी स्नॅक्स स्टोर करण्यासाठी साधे आणि सोपे हॅक्स -

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

तुम्ही कुरकुरीत खाऊ किंवा स्नॅक्स कसे स्टोर करता? बहुतेक घरांमध्ये एक खाऊचा डबा असतो आणि त्यात सर्व प्रकारचे स्नॅक्स ठेवले जातात. तसे त्यात काही चुकीचे नाही पण तुम्हाला स्नॅक्स चा कुरकुरीतपणा जास्त दिवस टिकवायचा असेल आणि तुमची स्नॅक्ससाठी केलेली मेहनत वाया घालवायची नसेल, तर तुम्ही खाली दिलेले स्टोरेज हॅक्स नक्की आम्लात आणू शकता.😀

सर्वात पहिले आपण समजून घेऊया कि क्रिस्पी स्नॅक्स किंवा कोरडा खाऊ म्हणजे नेमके काय. स्नॅक्स मध्ये प्रोसिस्ज्ड फूड्स जसे चिप्स, नाचोस, सोया स्टिक्स, चणा चोर, मूग व चणा डाळ, फरसाण हे असतात. तसेच स्नॅक्स मध्ये घरी बनवलेली चकली, कडबोळी, शेव, करंजी यांचा सुद्धा समावेश होतो. स्नॅक्स मध्ये चॉकलेट्स, कँडी बार, टॉफीस हे सुद्धा गणले जातात.

तर मंडळी, या सर्व स्नॅक्सचं स्टोरेज कसं करायचं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा.

. प्लास्टिक किंवा काचेच्या सीलबंद कंटेनर्सचा वापर करावा.

जेव्हा तुम्हाला स्नॅक्स साठी जार्स किंवा कंटेनर्सची खरेदी करायची असेल, तर तुम्ही आवर्जून काचेचे किंवा प्लास्टिकचेच कंटेनर्स विकत घ्या. अजून एक गोष्ट, लेबलवर 'एर टाइट' आणि सीलबंद आहेत ना हे चेक करून पहा.

काही घरांमध्ये प्लास्टिक  कंटेनर्सचा उपयोग स्टोरेज साठी होत नाही, स्टीलच्या डब्ब्यांचा वापर केला जातो. पण आमची एक सूचना आहे कि तुम्ही स्नॅक्स साठी स्टील ऐवजी काचेच्या जार्स चा वापर करा. तुमचा आवडीचा खाऊ कुरकुरीत तर राहतोच, वर जास्त दिवसांसाठी मजा घेऊ शकता. काचेचे जार्स वापरायला थोडे नाजूक असतात. म्हणून, जर तुमच्या घरी बच्चे कंपनी असेल, तर जार्स तुम्ही हाताळा व मुलांना खाऊ तुम्ही देत जा.

. कॅन्डिस या चॉकलेट्स सूर्यकिरणांपासून लांब ठेवा.🍬🍭🍫

काही चॉकलेट्स बिस्कीट-बेस्ड असतात. कॅन्डिस पण व्यवस्थित स्टोर करावे लागतात नाहीतर ते वितळू शकतात. म्हणून, कॅन्डिस आणि चॉकलेट्स सूर्यकिरणांपासून लांब ठेवावे. शक्यतो, ते एका प्लास्टिक किंवा काचेच्या जार मध्ये ठेवून, फ्रिज मध्ये स्टोर करावेत. जर खूप थंडी असेल, तर एखाद्या कोपऱ्यात ठेवावे, जेणेकरून सूर्यकिरणे त्यावर पडणार नाही आणि कॅन्डिस व चॉकलेट्स तसेच राहतील.

. बेक्ड बिस्किट्स कूकीस 🍪 असे स्टोर करा

बेकिंग हि एक कला आहे आणि जर तुम्हाला ती अवगत असेल, तर क्या बात है! पण तुम्ही बेकिंग झाल्यानंतर कूकीस, बिस्किट्स आणि केक्स कशात आणि कधी ठेवता? अच्छा, प्लास्टिक कंटेनर्स मध्ये? छान आहे! पण तुम्ही जर बेक्ड गोष्टी बेकिंग झाल्यानंतर ताबडतोब ठेवत असाल, तर नक्कीच तुमचे बिस्किट्स मऊ पडू शकतात आणि तुमचे कष्ट वाया जाऊ शकतात.

म्हणून, बेकिंग झाल्यानंतर कूकीस किंवा बिस्किट्स ना रूम टेम्परेचर वर येऊ दे आणि मग त्यांना ग्लास किंवा प्लास्टिक डब्यांमध्ये ठेवा. तुमचे कूकीस अगदी खुशखुशीत राहतील आणि तुमची मुले, पार्टनर किंवा फ्रेंड्स तुम्हाला 'थँक यु' म्हणतील. हि टीप आवर्जून करून पहा. घाईघाईमध्ये, नकळत लगेच बेक्ड कूकीस 🍪 ना डब्यात ठेवू नका.

. कुरकुरीत मऊ स्नॅक्स एकत्र कधीच ठेवू नये.

तुमच्या लक्षात आलं असेल कि तुम्ही डब्यात ठेवलेले स्नॅक्स एका दिवसात मऊ होतात. हो, अगदी प्लास्टिक सीलबंद कंटेनर मध्ये ठेवलेले स्नॅक्स सुद्धा लगेच मऊ होतात आणि सगळी मेहनत फुकट जाते.

आमचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी - तुम्ही क्रिस्पी व मऊ स्नॅक्स एकत्र ठेवता का?

त्याचमुळे तुमचे स्नॅक्स लगेच मऊ होतात. आता कुरकुरीत स्नॅक्स मध्ये शेव, चिप्स, चकली यांचा समावेश झाला. मऊ स्नॅक्स मध्ये लाडू, बिस्किट्स, कॅन्डिस हे सर्व आले. जेव्हा तुम्ही चकली आणि लाडू एकत्र ठेवता, तेव्हा त्यांचा सुवास मिसळला जातो आणि ओलावा सुद्धा. चकली, शेव यासारख्या स्नॅक्सना कधीच ओलावा लागू देऊ नये.

क्रिस्पी आणि सॉफ्ट स्नॅक्स साठी वेगवेगळे डबे आणि कंटेनर्स ठेवा, त्यामुळे तुमचा काम सोपं होईल आणि तुम्हाला स्नॅक्स खायला मज्जा सुद्धा येईल.

. ओव्हन चा वापर योग्य पद्धतीने करा.

आता तुम्ही म्हणाल कि स्टोरेज हॅक्स सांगताना मधेच ओव्हन कुठून आला. तर, आम्ही ओव्हन चा वापर तुमचा कोरडा खाऊ जास्त दिवस टिकण्यासाठी कसा करावा हे सांगणार आहोत. हि टीप थोडी वेगळी वाटेल, पण नक्की फायदेशीर ठरेल.

ओव्हन चा उपयोग जास्तकरून जेवण गरम करण्यास, केक बनवण्यास केला जातो. पण तुम्ही ओव्हन चा उपयोग क्रिस्पी स्नॅक्स अजून क्रिस्पी बनवण्यात करू शकता.

जेव्हा तुम्हाला वाटेल कि तुमचे स्नॅक्स मऊ होत आहेत किंवा होऊ शकतात, फ्रेश वाटत नाहीये, तेव्हा हा हॅक ट्राय करा. खाऊ परत एकदा ओव्हन मध्ये ३० सेकंड्स किंवा १ मिनिटासाठी हीट करा आणि मग पहा. तुमची चकली किंवा चिप्स 🍟 परत पाहिल्यासारखे क्रिस्पी होतील आणि तुम्ही एन्जॉय करू शकाल.

. बिस्किट्स किंवा कूकीस फ्रेश राहण्यासाठी हि टीप करून पहा.

बिस्किट्स साठी प्लास्टिक कंटेनर किंवा ग्लास जार विकत घ्या. आणि बिस्किटे ठेवण्याआधी कंटेनरच्या तळाला एक ब्लॉटिंग पेपर पसरा. अगदी छोटीशी टीप आहे पण तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या स्नॅक्स आणि बिस्किट्स चा खुशखुषितपणा अजून टिकवायचा असेल, तर कंटेनर मध्ये एक साखरेचा क्यूब ठेवून पहा.

ब्लॉटिंग पेपर तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानांमध्ये मिळून जाईल. फक्त बिस्किट्स स्टोर करण्याआधी हि टीप करून पहा. बिस्किटांवर ब्लॉटिंग पेपर ठेवू नका. कंटेनरच्या तळाला ठेवा.

. एर टाइट बॅग्स 👝चा वापर योग्य वेळी करा.

जर तुम्ही नेहमीच एर टाइट बॅग्स चा वापर स्नॅक्स ठेवण्यासाठी करत असाल तर ते चुकीचे आहे. प्लास्टिकचा अतिरिक्त उपयोग आरोग्यासाठी चांगला नाही. पण तुम्ही काही विशिष्ट वेळी एर टाइट बॅग्स चा उपयोग करू शकता.

उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर स्नॅक्स तुम्ही एर टाइट बॅग्स मध्ये पॅक करून सोबत घेऊ शकता. थोड्या वेळासाठी बॅग्स सेफ आहेत आणि तुमचे स्नॅक्स पण छान कुरकुरीत राहतील. फक्त एवढीच काळजी घ्याल कि ड्राय आणि मऊ स्नॅक्स वेगवेगळ्या बॅग्स मध्ये स्टोर करा.

तर वरील दिलेले हॅक्स करून पहा आणि क्रिस्पी स्नॅक्स चा आनंद घ्या.

Logged in user's profile picture

कुरकुरीत स्नॅक्स कसे स्टोर करतात?

प्लास्टिक किंवा काचेच्या सीलबंद कंटेनर्सचा वापर करावा.

कॅन्डिस या चॉकलेट्स सूर्यकिरणांपासून लांब ठेवा

बेक्ड बिस्किट्स व कूकीस 🍪 असे स्टोर करा.

कुरकुरीत व मऊ स्नॅक्स एकत्र कधीच ठेवू नये.

ओव्हन चा वापर योग्य पद्धतीने करा.

बिस्किट्स किंवा कूकीस फ्रेश राहण्यासाठी हि टीप करून पहा.

एर टाइट बॅग्स 👝चा वापर योग्य वेळी करा.