तुमचे कुरळे केसही राहतील स्पेशल! जाणून घ्या सोप्या टिप्स

5 minute
Read

Highlights

'कुरळे केस' म्हणजे एक स्टाईल स्टेटमेंट बनलेली आहे. मात्र, त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर ते तितकेच खराब होण्याची शक्यता असते.कुरळ्या केसांमध्ये कोरडेपणाची समस्या जास्त असते अशावेळी केसांना योग्य पोषण आणि उपायाची गरज असते. तेव्हा चला तर जाणून घेवूया कशी घ्यावी कुरळ्या केसांची काळजी.



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

काळेभोर सुंदर, लांब आणि निरोगी केस हे प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. मग ते केस सरळ असो वा कुरळे. तुमचे केस कोणत्याही प्रकारातले असो त्याची काळजी घेतली की ते छान आणि निरोगी राहतात. ज्यांचे केस सरळ असतात त्यांना आपले केस कुरळे असावेत असे वाटत असते आणि ज्यांचे कुरळे आहेत त्यांना सरळ केस हवेहवेसे वाटतात. कुरळे केस दिसायला खूप छान दिसतात पण त्यांची काळजी घेणं तेवढंच खूप खास आणि महत्वाचं आहे. आता कुरळे केस म्हटले की अभिनेत्री कंगना राणौत, सान्या मल्होत्रा, तापसी पन्नू, द्रष्टी धामी अशा अनेक अभिनेत्री डोळ्यासमोर आल्या असतील. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कुरळ्या केसांसाठी काही खास टिप्स 

a woman with curly hair

  • कुरळ्या केसांमध्ये कोरडेपणाची समस्या कॉमन आहे. तुम्ही कुरळे केस जास्त धुतले तर त्यातील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे आठवड्यातून साधारण 2 ते 3 वेळाच कुरळ्या केसांसाठी हेअर वॉश चांगला आहे. कुरळे केस धुताना केसांना व्यवस्थित तेलाने मालिश करा म्हणजे केसांमधील कोरडेपणा निघून जाईल. 
  • आठवड्यातून किमान एकदा तरी तेल गरम करून कुरळ्या केसांना मालिश करायला हवे.यासाठी तुम्ही बदाम तेल अथवा नारळाचं तेल गरम करून तुमच्या केसांना लावू शकता. कुरळ्या केसांवर संध्याकाळी तेल लावून रात्रभर ते मुरायला ठेवा आणि सकाळी डोक्यावरून शँपू लावून आंघोळ करा असा सल्ला दिला जातो. 
  • कुरळे केस विंचरणं सगळ्यात मोठा टास्क म्हणायला हवा. कुरळ्या केसांचा जास्त गुंता होतो. म्हणून केस विंचरताना ब्रश केसांमधून ओढू नका कारण असे केले तर केस तुटतात. कुरळ्या केसांमध्ये नेहमी हलक्या हाताने कंगवा फिरवावा जेणेकरून केसांचा गुंता सोडवण्यास मदत होते. कुरळे केस मुलायम बनवण्यासाठी हातावर लिव-इन कंडिशनर घेऊन केसांना लावा. यामुळे तुमचे केसातील गुंता सुटेल शिवाय केस विंचरताना तुटणार नाही.

a lady brushing her curly hair

  • कुरळे केस धुतल्यानंतर टॉवेलने घट्ट बांधून ठेवू नका. केस टॉवेलने रगडून पुसण्याचा प्रयत्नही करु नका.अतिशय तलम असा टॉवेल तुम्ही कुरळे केस पुसण्यासाठी वापरा. कुरळ्या केसांना शँपूने धुतल्यानंतर त्यावर कंडिशनर लावायला हवेच. यामुळे केस अतिशय मऊ आणि मुलायम होतात कुरळे केस सुकवण्यासाठी सहसा ड्रायरचा वापर करु नये. कुरळ्या केसात आधीच कोरडेपणाची समस्या असते त्यात ड्रायरचा वापर केल्यास केस अधिक कोरडे होतात. 

coconut oil in a bowl

  • कुरळ्या केसांना वेळोवेळी हेअरमास्क लावून त्यांना पोषण देण्याचा प्रयत्न करा म्हणजे कोरडेपणा कमी होईल. तुम्ही हेअरमास्क घरी करु शकता. एका कपामध्ये दोन चमचे अंड्याचा सफेद भाग त्यात दोन चमचे दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. साधारण अर्धा तासानंतर हेअर वॉश घ्या. हेअर मास्कचा आणखी एक प्रकार म्हणजे दोन चमचे नारळाच्या तेलामध्ये 4 चमचे कोरफड जेल आणि 3 चमचे दही मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावून साधारण अर्ध्या तास ठेवा आणि केस थंड पाण्याने धुवा. 

a lady with her hair in a braid

कुरळ्या केसांच्या हेअरस्टाईल्स काय करायच्या असा प्रश्न देखील तुमच्या मनात उभा राहीला असेल. कुरळ्या केसांसाठी  पाईनॅप्पल बन, कर्ली लो बन, पोनीटेल, मेसी बन, एका बाजूने पिन अप किंवा पूर्ण पिन अप किंवा वेणी घालू शकता. समजा यातील कोणतीही हेअरस्टाईल तुम्हाला करता आली नाही तर कुरळे केस मोकळे सोडा छान दिसतात. तुम्ही या टीप्सचा उपयोग केलात तर आपले कुरळे केस म्हणजे वरदान आहे असंच म्हणाल. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा तसेच तुम्ही कुरळ्या केसांसाठी काही खास गोष्टी करत असाल तर ते शेअर करायला विसरु नका.

अनिता किंदळेकर 

 

 

Logged in user's profile picture