आपले वीकेंड्स प्रॉडक्टिव्ह कसे कराल? या आहेत ५ टिप्स

8 minute
Read

Highlights

या वीकएंडला काय करत आहेत? जाणून घ्या काही टिप्स ज्याने तुमचे वीकेंड्स होतील प्रॉडक्टिव्ह आणि आरामदायी -

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

फ्रायडे म्हटले कि वीकएंड ची चाहूल लागते आणि वीकएंड म्हणजे फुल्ल-टू आराम. सिंगल मुलींसाठी वीकएंड म्हणजे १२ पर्यंत झोपणे, मग पार्लरला जाणे किंवा एखादा फेस मास्क लावणे आणि ‘नेटफ्लिक्स अँड चिल्ल्ल......!' आणि वर्किंग  वूमन साठी वीकएंड म्हणजे थोडासा आराम आणि खूप काही काम. ऑफिसचे काम नसले तरी घराची साफसफाई आणि त्यात बाईने दांडी मारली कि सगळी तारांबळ उडते.

वीकएंड असाच कामात आणि आरामात निघून जातो आणि मग ‘मंडे ब्लूस’ चालू होतात. आपल्याला एका क्षणी वाटते कि आयुष्य असच चालू राहिले तर वीकएंड ची मजा कधी घेणार. मंडेला असे का वाटते कि ऑफिस ला जाऊच नये. मात्र काही लोक खूप ताजेतवाने दिसतात. ते ऑफिसचे काम अगदी मन लावून करतात आणि आपले वीकएंड प्लॅन करतात.

तर आज आपण जाणून घेऊया कि वीकएंड प्रॉडक्टिव्ह कसे करता येतील आणि तुम्ही तुमचा वीकएंड चांगल्या पद्धतीने अनुभवल्याचा समाधान मिळेल.

१. घरगुती कामे आटपण्यासाठी टाइमर ⏲ लावा.

बहुतेक वेळा असं होतं कि आपण घरातील कामे करण्यात दंग होतो आणि संपूर्ण वीकएंड त्यातच गेला आणि आराम किंवा मनोरंजन केले नाही, हे लक्षात होते. असे का होतं, माहीत आहे का तुम्हाला? कारण जेव्हा वेळेचे बंधन नसते तेव्हा आपण त्या कामात किती वेळ जात आहे याचा विचार करत नाही. म्हणून किती वेळा असं होतं कि वीकएंड फक्त लॉंड्री आणि साफसफाई मध्ये निघून गेला आणि तुम्हाला तुमची आवडती सिरीस बघायलासुद्धा वेळ मिळाला नाही.

आमची टीप अशी आहे कि जेव्हा तुमची घरातील कामे कराल तेव्हा एक टाइमर लावा. म्हणजे वेळेचं बंधन असलं कि मग तुम्ही पटापट कामे कराल आणि बाकीच्या महत्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ देता येईल. अजून एक बोनस टीप अशी आहे कि प्रयत्न करा कि हि सर्व कामे तुम्ही फ्रायडे नाईट लाच उरकून टाकाल. म्हणजे शनिवारी सकाळी तुमचा वेळ यात जाणार नाही आणि तुम्ही सेल्फ-केर किंवा कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल.

टाइमर तर नाकी लावाच. टाइमर जास्त वाटत असेल तर वेळ ठरवा कि तुम्ही घरातली कामे ठराविक वेळेतच पूर्ण कराल.

२. डिजिटल डिटॉक्स 📵 ची कल्पना आम्लात आणा.

बहुतेक महिलांसाठी वीकएंड म्हणजे बींज-वॉचिंग पण असू शकतं. वीकएंड ला आपण सर्व सोशल मीडिया चेक करतो, लोकांशी इन्स्टा किंवा फेसबुकवर गप्पा मारतो, फोटोस बघतो, रील्स पाहतो आणि नेटफ्लिक्स वरचे शोस बघतो. पण तुमच्या कधी लक्षात आलं आहे का कि यात तुमचा स्क्रीन टाइम वाढत आहे आणि तुमच्या डोळ्यांना आणि मनाला आराम मिळत नाहीये.

या गोष्टींचा ‘रेस्ट’ मध्ये समावेश होऊ शकत नाही. उलट तुम्ही कुणाचे फोटोस पाहून अस्वस्थ होता किंवा उगाच कुणाशी तर ऑनलाईन बोलून तुमचा वेळ वाया घालवत आहात. त्यापेक्षा तुम्ही जर थोड्या वेळासाठी डिजिटल डिटॉक्स कराल, तर तुमच्या मनाला खूप शांत वाटेल.

आठवडाभर आपण ऑफिसचे काम करून किंवा अभ्यास करून खूप स्ट्रेस्ड असतो. म्हणून जेव्हा आपण सर्व गॅजेट बंद करतो आणि एखादे पुस्तक वाचतो किंवा विश्रांती घेतो तेव्हा खूप छान वाटते. आम्ही असं म्हणत नाही तुम्ही संपूर्ण वीकएंड मोबाईल आणि स्क्रीन पासून लांब रहा पण तुम्ही हा नियम किमान ३ ते ४ तासांसाठी नक्की करू शकता. अजून माहितीसाठी तुम्ही ऍलेक्स सुजंग-किम पॅंग यांची 'रेस्ट' हे पुस्तक वाचा.

३. स्वतः साठी थोडा वेळ द्या.

बऱ्याच महिलांना वीकएंड म्हणजे फॅमिली साठी टाइम देणे असाच अर्थ होतो. कधी मुलांच्या परीक्षा असतात किंवा फॅमिली फंक्शन असते, किंवा घराची साफसफाई! महिला स्वतः साठी वेळ देतच नाहीत आणि मग सोमवारी ऑफिसला जाताना अजूनच थकवा येतो.

म्हणून आमचा असा सल्ला आहे कि स्वतः साठी वेळ द्या. फक्त एक-दोन तास सुद्धा पुरेसे आहेत. या वेळेत तुमच्या आवडीची गोष्ट करा. मग त्यात पुस्तक वाचणे असू शकते, गाणी ऐकणे, एखादा वर्कशॉपला जाणे, मैत्रिणींबरोबर मूवी ला जाणे किंवा फक्त झोपणे. ‘मी-टाइम’ हा सर्वांसाठी आहे आणि तो एन्जॉय करण्यात तुम्ही सेल्फिश होत नाही. म्हणून शुक्रवारीच ठरवा कि तुम्ही वीकएंड मध्ये मी-टाइम ला काय करणार आहात. जेव्हा तुम्ही आधीच ठरवाल, तेव्हा तुम्ही आठवणीने ते कराल आणि दुसरा व्यत्यय येणार नाही.

४. आपल्या आयुष्याबद्दल विचार 🤔 करा.

यात सिरीयस काही नाही ह! आयुष्याबद्दल विचार म्हटलं कि काहीतरी गहन विचारच असेल किंवा काहीतरी बोरिंग असेल, असं अजिबात नाही. आयुष्य म्हणजे विविध घडामोडी आल्या आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी वीकएंडचा एक तास हि पुरेसा आहे.

जर्नल किंवा डायरी सोबत ठेवा आणि तुमच्या मनातील गोष्टी लिहा. तुम्हाला कसं वाटत आहे, तुम्ही अस्वस्थ आहात का कि स्ट्रेस्ड आहात, हे सर्व लिहा आणि बघा तुम्हाला किती छान वाटेल. हे झालं आयुष्यातील घटना आणि गोष्टींचं. पण बाकीच्या गोष्टी पण आल्यात ना! तुम्हाला काही विकत घ्यायचा आहे का, तुमचे सेविंग्स पुरेसे आहेत का, इन्व्हेस्टमेंट अजून करायची आहे का आणि ती कुठे करायची आहे, तुमचे खर्च आटोक्यात आहे का, या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही वीकएंड ला करू शकता.

त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या पार्टनर बरोबर महत्वातचे संवाद साधायचे असेल किंवा एखादी गोष्ट डिसकस करायची असेल, तर ती आठवणीने वीकएंडला करा.

५. सायकॉलॉजिकल संशाईन 🌞 मिळवा.

सायकॉलॉजिकल संशाईन हि कन्सेप्ट डॉक्टर डेविड श्वार्ट्झ यांच्या 'द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग' या पुस्तकात दिली आहे. तर लेखक असे म्हणतात कि ज्या व्यक्ती वीकएंड ला फक्त टीव्ही बघणे, घरातली कामे करणे आणि नुसतेच पडून राहणे, हे कार्य करतात, त्यांना सायकॉलॉजिकल संशाईन मिळत नाही. त्यांना सोमवारी ऑफिसला जाताना वाटते कि वीकएंड तर असाच निघून गेला आणि आपण काहीच केले नाही.

पण त्या उलट, एक व्यक्ती जी वीकएंड ला ट्रेक ला जाते किंवा आपल्या आवडीच्या छंदांमध्ये वेळ देते, त्या व्यक्तीला सायकॉलॉजिकल संशाईन मिळते आणि त्यांना पूर्णपणे ‘रीफ्रेश्ड’ वाटते. ऑफिसला परत जाताना ते ताजेतवाने असतात आणि आपले काम मन लावून करतात.

म्हणून तुम्ही हे जाणून घ्या तुम्हाला सायकॉलॉजिकल संशाईन कुठून मिळते. एखादे पुस्तक वाचून, आपल्या पार्टनर सोबत वेळ घालवून कि ट्रेक ला जाऊन. समजून घ्या आणि संशाईन नक्की मिळवा.

तर वरील दिलेल्या टिप्स वापरून तुम्हे तुमचे वीकएंड प्रॉडक्टिव्ह करू शकता आणि आयुष्याला एक दिशा मिळवून देऊ शकता.

Logged in user's profile picture

आपले वीकेंड्स प्रॉडक्टिव्ह कसे कराल?

घरगुती कामे आटपण्यासाठी टाइमर लावा.

डिजिटल डिटॉक्स ची कल्पना आम्लात आणा.

स्वतः साठी थोडा वेळ द्या.

आपल्या आयुष्याबद्दल विचार करा.

सायकॉलॉजिकल संशाईन मिळवा.

स्वतःसाठी वेळ कसा काढायचा?
स्वतः साठी वेळ द्या. फक्त एक-दोन तास सुद्धा पुरेसे आहेत. या वेळेत तुमच्या आवडीची गोष्ट करा. मग त्यात पुस्तक वाचणे असू शकते, गाणी ऐकणे, एखादा वर्कशॉपला जाणे, मैत्रिणींबरोबर मूवी ला जाणे किंवा फक्त झोपणे. ‘मी-टाइम’ हा सर्वांसाठी आहे आणि तो एन्जॉय करण्यात तुम्ही सेल्फिश होत नाही. म्हणून शुक्रवारीच ठरवा कि तुम्ही वीकएंड मध्ये मी-टाइम ला काय करणार आहात. जेव्हा तुम्ही आधीच ठरवाल, तेव्हा तुम्ही आठवणीने ते कराल आणि दुसरा व्यत्यय येणार नाही.