'वाणा'चे हटके प्रकार !!

8 minute
Read

Highlights दरवर्षी संक्रातीच्या हळदिकुंकवात वाण काय द्यायचे? हा प्रश्न प्रत्येक महिलांना सतावत असतो. उपयोग, थोडी हटके अशी वस्तू 'वाण' म्हणून द्यायला हवी. तसेच चारचौघात त्या 'वाणा'चं कौतुक व्हायला हवं. आपल्याकडे रथसप्तमीपर्यंत संक्रातीचे हळदिकुंकू करतात. तुम्हीही काहीतरी वेगळे 'वाण' देण्याचा विचार करत असाल तर वाचा 'वाणा'चे हटके प्रकार...

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

जानेवारीतील पहिला सण म्हणजे संक्रांतआणि संक्रांत म्हटलं की हळदीकुंकू आलंच. तसं पाहिलं तर रथसप्तीमीपर्यंत हळदीकुंकवाचे कार्यक्रम होतात.महिलांना सेलिब्रेशनसाठी हा सण म्हणजे एक पर्वणीच आहे. संक्रांतीच्या हळदिकुंकवात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘वाण’ देणे. सध्या वाण म्हणजे काहीतरी वेगळी वस्तू देण्याची पद्धत आहे. परंपरेप्रमाणे हळदकुंकू, आरसा, फणी, टिकलीचे पाकिट, ब्लाऊसपीस, चमचा-वाटी, गुळाची ठेप यापेक्षा काहीतरी वेगळं वाण देण्याचे ठरविले असेल तर पुढील गोष्टींचा वापर तुम्ही करु शकता.

• स्लिंग बॅग

मोबाईल, घरची किल्ली, पाण्याची छोटी बाटली आणि थोडे पैसे बॅगेत टाकले की तुम्ही फिरायला मोकळ्या आहात. सकाळी किंवा संध्याकाळी वॉक घेताना तुम्ही स्लिंग बॅगचा वापर करु शकता.

• फ्रिज बॅग किंवा कापडाच्या पिशव्या

बाजारातून आणलेली फळे आणि भाज्या ठेवण्यासाठी फ्रिज बॅगचा वापर होवू शकतो. तसेच प्लॅस्टिक बंदीमुळे कापडी पिशवी सर्वोत्तम आहे. भाज्यांसाठी वेगवेगळे कप्पे असणारी पिशवी हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

फ्रिज बॅग

• बांबूपासून तयार केलेल्या वस्तू

पेपर स्टँण्ड, ट्रे, फाईल ट्रे, फुलांचा स्टँण्ड, टी कोस्टर्स, शोभेच्या वस्तू असंही काही वाण म्हणून द्यायला हरकत नाही. अशा वस्तू ऑफिसमधल्या टेबलावर किंवा बेडशेजारच्या स्टूलावर छान शोभून दिसतात.

• घरगुती चटणी किंवा लोणचे

अनेक बचत गट घरगुती लोणची आणि चटणी तयार करतात. 50 ग्रॅम चटणी किंवा लोणचे छोट्या डबी मिळते. वाण म्हणून हा एक चांगला पर्याय आहे. एक उपयोगी वस्तू देण्याचा आणि बचत गटाला मदत असे दोन्ही हेतू साध्य होतात.

घरगुती चटणी किंवा लोणचे

• चौरंग, उदबत्ती घर किंवा दिवा

मीनाकारी काम केलेले मेटलचे वेगवेगळ्या आकारातले चौरंग आजकाल सर्रास मिळतात. पूजेच्या वेळेस दिवा, फळ किंवा दुधाची वाटी असं काहीही ठेवता येते. उदबत्तीघर तसं प्रत्येकाच्या घरी असतंच. पण त्यातही ते थोडं डेकोरेटिव्ह असेल तर खास प्रसंगांसाठी राखून ठेवलं जातं. झाकण असणारा पितळी दिवा, धुप जाळण्यासाठी धुपघर भेट म्हणून देता येईल.

• कॅलेंडर किंवा पॉकेट कॅलेंडर

वेगवेगळ्या तारखांना नोंद करण्यासाठी महिलांना नेहमी कॅलेडर हाताशी लागते. गॅस कधी लावला ते दुधवाल्याचे बिल अगदी छोट्या नोंदी असतात म्हणून संक्रांतीचे वाण म्हणून कॅलेंडर देणे हा उत्तम उपाय आहे. यामध्ये आपण पॉकेट कॅलेंडर किंवा टेबल कॅलेंडरही देऊ शकतो. ऑफीसमध्ये किंवा घरीही टेबलवर ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.

कॅलेंडर

• मसाले

वेगवेगळ्या ब्रँडची मसाल्याची पाकीटे वाण म्हणून देवू शकता. अगदी सांबार मसाल्यापासून पावभाजी, पनीर भाजी, बिर्याणी मसाला असे बरेच पर्याय असतात. तुम्ही स्वतः एखादा मसाला तयार करून त्याचा एक स्पेशल टच देवू शकता.

• खणाचे पाऊच किंवा पर्स

सध्या खणाच्या साड्या किंवा ड्रेस घालण्याची फॅशन आहे. खणाचे पाऊच किंवा खणाच्या पर्स ही महिलांची विशेष आवड झालीय.खणाचे कापड देवून तुम्ही खणाचे पाऊच शिवून घेवू शकता.

खणाचे पाऊच

• ब्युटी हँपर

एका आकर्षक पिशवीत छोटी लिपस्टिक किंवा आयशॅडो पॅलेट्स, आयलायनर अगदी काजळ पेन्सिल, छोटे बॉडी लोशन किंवा व्हॅसलीन तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील त्या घातून ब्युटी हँपर देवू शकता. तसं महिलांना नटायला मुरडायला आवडतं त्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे.

• साडी कव्हर

महिलांचा आवडीचा विषय म्हणजे साडी. साडी ठेवण्याासाठी बाजारात खास साडी कव्हर मिळतात. साडी कव्हरमध्ये साडी ठेवली तर ती व्यवस्थीत राहते. म्हणून साडी कव्हर हा वाण म्हणून चांगला पर्याय आहे.

साडी कव्हर

• ग्रीन टी पाकिट

लठ्ठपणा ही वाढती समस्या आहे. ग्रीन टी घेतल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे ग्रीन टी पाकिटे वाण म्हणून देवू शकता.

• नोटपॅड

वेगवेगळ्या कामांची, किराणा सामानाची यादी करावी लागते, मग अशावेळी गरज असते नोटपॅ़डची ! त्यामुळे वाण म्हणून तुम्ही लहानसे एखादे नोटपॅड आणि पेन देऊ शकता.

नोटपॅड

• ड्रायफ्रुट कटर

सुकामेवा आपण सगळेजण खातो. हलवा आणि खिर सगळ्यांच्या घरी तयार होते त्यात सुकामेवा हमखास घालतात. हा सुकामेवा ड्रायफ्रुट कटर किंवा स्लायसरने कट केला तर एकाच आकारात तुकडे होतात. त्याचा उपयोग खाद्यपदार्थात घालण्यासाठी आणि सजावटीसाठी होवू शकतो. म्हणून ड्रायफ्रुट कटर वाण म्हणून एक चांगला पर्याय आहे.

• चिरलेल्या भाज्या किंवा लसूण

सध्या बाजारात चिरलेल्या भाज्या, मोड आलेले कडधान्य, सोललेला लसूण छोट्या पाकीटात मिळतो. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी या गोष्टी सर्वोत्तम पर्याय आहेत.

चिरलेल्या भाज्या किंवा लसूण

• दुपट्टा ,स्कार्फ, खणाचे ब्लाऊज पीस

सध्या ब्लाऊज पीस देण्याचा ट्रेन्ड कमी झालाय. कांथा वर्क,कलमकारी, मधुबनी किंवा वारली प्रिट असणारे किंवा खणाचे ब्लाऊजपीस वाण म्हणून द्या तुमचं सगळीकडे कौतुक होईल यात शंकाच नाही. लेहरिया किंवा बारीक दुपट्टा, प्लेन किंवा प्रिन्टेड स्कार्फ हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.ब्रोकेडचेही स्कार्फ मिळतात. काहीजणी ते अंगावर घेतात तर काहीजण पूजेच्या वेळेस मूर्तीखाली ठेवतात. आता प्रत्येक गोष्ट कशी वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण उपयोग व्हायला हवा अशा वस्तू वाण म्हणून द्यायला हव्यात.

दुपट्टा ,स्कार्फ

• छोटी थर्मास बॉटल्स किंवा फ्लास्क

हे थोडं महागडं वाण आहे पण हे वाण तुम्ही ज्यांना देणार ते कायम तुमची आठवण काढतील. घरी आणि ऑफिसमध्ये थर्मास बॉटल्स किंवा फ्लास्क उत्तम पर्याय आहेत

स्वस्त आणि मस्त वाण

वाण देण्यासाठी तुमचे बजेट खूप कमी असेल पण काही तरी उपयुक्त द्यायचे असेल तर तुम्ही

• मुग आणि तांदूळ एकत्र करून खिचडीचे पाकिट
• साडी पीन, केसाला लावायचे पीन, क्लचर, युपीन
• मेंदिचे कोन किंवा मेंदिचे पाकिटे
• ओट्स बिस्किटे, आटा मॅगी
• सुई-दोरा प्रत्येक घरात हवा. दोन रंगाच्या दोऱ्याचे रिळ आणि एक सुई असं पाकिट
• पेपर सोप्स बाहेर असताना हात धुण्यासाठी चांगला पर्याय
• धान्याची पाकिटे यामध्ये तांदूळ, डाळ आणि कडधान्य वापरू शकता.
• तुळशीचे रोप किंवा शोभेचं रोपटं

संक्रातीसाठी वाण म्हणून उपयोगी, खिशाला परवडणारे अनेक पर्याय आम्ही दिलेले आहेत. तुम्हाला वाणाचे हे पर्याय कसे वाटले तसेच यंदा तुम्ही वाण म्हणून काय लुटलं ते आम्हाला नक्की कळवा.

अनिता किंदळेकर

Logged in user's profile picture

संक्रातीच्या हळदिकुंकवात वाण काय द्यायचे?

स्लिंग बॅग

फ्रिज बॅग किंवा कापडाच्या पिशव्या

बांबूपासून तयार केलेल्या वस्तू

घरगुती चटणी किंवा लोणचे

चौरंग, उदबत्ती घर किंवा दिवा

कॅलेंडर किंवा पॉकेट कॅलेंडर

मसाले

खणाचे पाऊच किंवा पर्स

ब्युटी हँपर

साडी कव्हर

ग्रीन टी पाकिट

स्वस्त आणि मस्त वानचे प्रकार
वाण देण्यासाठी तुमचे बजेट खूप कमी असेल पण काही तरी उपयुक्त द्यायचे असेल तर तुम्ही

मुग आणि तांदूळ एकत्र करून खिचडीचे पाकिट

साडी पीन, केसाला लावायचे पीन, क्लचर, युपीन

मेंदिचे कोन किंवा मेंदिचे पाकिटे

ओट्स बिस्किटे, आटा मॅगी

सुई-दोरा प्रत्येक घरात हवा. दोन रंगाच्या दोऱ्याचे रिळ आणि एक सुई असं पाकिट

पेपर सोप्स बाहेर असताना हात धुण्यासाठी चांगला पर्याय

धान्याची पाकिटे यामध्ये तांदूळ, डाळ आणि कडधान्य वापरू शकता.

तुळशीचे रोप किंवा शोभेचं रोपटं